आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत निरीक्षक कार्यालयास आग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शासनाच्या विद्युत निरीक्षक, विद्युत निरीक्षण विभाग, उद्योग, ऊर्जा आणि कर्मचारी खाते विभागाच्या संत एकनाथ रंगमंिदरासमोरील कार्यालयाला शुक्रवारी दुपारी आग लागली. कार्यालयातील रद्दीमुळे आग लागली होती. कार्यालयातील कर्मचारी, पोलिस आणि अग्निशामक िवभागाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

कार्यालय दोनमजली असून खालच्या मजल्याच्या मागील बाजूस असलेल्या खोलीला आग लागली. या खोलीत रद्दी कागदपत्रे ठेवलेली होती. दुपारी खोलीतून धूर येण्यास सुरुवात झाली. कार्यालयात पाणी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी शेजारच्यांकडून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने भडका घेताच अग्निशमन विभागाला कळवण्यात आले. अग्निशमन विभागाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. सी. डी. कवठे आणि सुनीता रावते यांच्यावर कार्यालयप्रमुखाची जबाबदारी आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागली नसल्याचा अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. उस्मानपुरा पोलिस स्टेशन बीट मार्शलचे अंकुश चव्हाण, बी. एस. कामबने, एस. व्ही. चौधरी यांच्यासह अग्निशमन विभागाचे जवान शरद घाटेशाही, संजय कुलकर्णी, अब्दुल अजीज, अशोक वेलदोडे, सुभाष दुधे यांनी आग आटोक्यात आणली.