आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बल्बच्या गोदामाला आग, १०० फुटांवरून पाण्याचा मारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - औद्योगिक परिसरातील एक्स-३० सेक्टर, गणेश कॉम्प्लॅक्सच्या दुकान क्र. सातमधील ‘एम्स इंजिनिअरिंग्स’च्या गोदामाला गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दल जवानांच्या दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत एलईडी बल्ब आदी साहित्य खाक होऊन ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाल्याची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिसांत करण्यात आली आहे. दरम्यान, परिसरातील कचरा जाळल्यामुळे लाग लागली असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून त्याला अद्याप पोलिसांचा दुजोरा मिळालेला नाही.
वाळूज औद्योगिक परिसरातील कारखान्यांना मागणीनुसार एलईडी बल्बचा पुरवठा करणारे ठेकेदार अरुण नंदलाल मुंदडा (रा.एन-४ सिडको,औरंगाबाद) यांचे गणेश कॉम्प्लेक्समध्ये गोदाम आहे. गत सात ते आठ वर्षांपासून मुंदडा या गोदामात विविध साहित्याचा साठा करतात. गुरुवारी सकाळी ९.३० च्या सुमारास गोदामातून धूर येत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तत्पूर्वी लक्ष्मण डोळस यांनी ९.४५ वाजता वाळूज एमआयडीसी अग्निशमन दलास फोन करून घटनेची माहिती दिली. अग्निशमन अधिकारी पी.व्ही.जाधव,आर.एस.फुलारे, चालक एस.आर.गायकवाड तसेच फायरमन बी.एन.राठोड,एस.एस.आंभोरे,जी.एम.वनगा,सी.आर.पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली.
गोदामावरील एका खोलीत ते गॅस सिलिंडर असल्याचे समजल्याने जवानांनी साधारणत: १०० फुटांवरून पाण्याचा मारा केला. ४० फूट लांब १५ फूट रुंंदीच्या या गोदामाचे शटर उचकटून पाण्याचा मारा करूनही आग आटोक्यात येत नसल्याने अखेर जवानांनी शटर तोडले. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात जवानांना यश मिळाले.
अनर्थटळला : तळमजल्यावरीलशॉप नंबर ला आग लागली. त्या वेळी वरील मजल्यावरील खोलीत एमपीएससीच्या विद्यार्थांचा शिकवणी वर्ग सुरू होता. २० ते २५ विद्यार्थी वर्गात होते. याच ठिकाणी १०० विद्यार्थ्यांची जेवण राहण्याची व्यवस्था आहे. स्वयंपाक बनवण्यासाठी ते गॅस सिलिंडर खोलीत होते. मात्र,आग लागल्याचे लक्षात येताच शिक्षकांनी ते इतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सांगितले. तसेच तिथेच राहणाऱ्या विद्यार्थांना आग लागल्याची कल्पना देऊन खोल्या रिकाम्या करण्यास सांगितल्याचे डोळस यांनी सांगितले.

शेजाऱ्यांचेही नुकसान
दोन्ही बाजूने शटर बंद असणाऱ्या गोदामातील इलेक्ट्रिकल वस्तूंनी पेट घेतल्यामुळे अागीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या. त्यामुळे बाजूच्या शॉपधारकांचे नुकसान झाले. बाळासाहेब पाथ्रीकर यांच्या त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन ऑफिसचे दोन एसी खाक झाले. इतरांचेही थोड्याफार प्रमाणात नुकसान झाल्याचे शॉपमालकांनी सांगितले.

म्हणून लागली आग... : गोदामात वीज मीटर, इलेक्ट्रिकल वायरिंग नाही. त्यामुळे आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नाही. परंतु, सकाळी गोदामाबाहेर कुणीतरी कचरा जाळला. त्या वेळी वाऱ्यामुळे जळता कचरा शटर खालून आत गेल्याने आग लागल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींतून वर्तवण्यात येत होता.
बातम्या आणखी आहेत...