आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमिनीची तक्रार येताच बंदुकीचा परवाना रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दौलताबाद परिसरातील ३० एकर ३६ गुंठे जमिनीचा वाद सुरू आहे. नात्यातीलच बांधकाम व्यावसायिकाने ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार गुरुवारी पोलिस आयुक्तालयात आयोजित लोकअदालतमध्ये येताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या बिल्डरच्या रिव्हॉल्व्हरचा परवाना रद्द करण्याचे आदेश पाेलिसांना दिले. इतर चार प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
गुरुवारी पोलिस आयुक्तालयामध्ये जमीन बांधकाम व्यावसायिक आणि सोसायट्यांसंदर्भातील गुन्हे तक्रारींचा निपटारा करण्यासाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती आर्थिक शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांची उपस्थिती हाेती. आर्थिक फसवणूक झालेल्या शहरातील अनेकांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन तक्रारी नोंदवल्या होत्या. शहर हद्दीमधील जमिनीच्या प्रकरणांत बांधकाम व्यावसायिकांना तंबी देत पोलिसांनी काही प्रकरणे तत्काळ सोडवली. बांधकाम व्यावसायिक रऊफ खान पटेल इतर काही जणांमध्ये दौलताबाद परिसरातील ३० एकर जमिनीचा वाद हाेता. या प्रकरणाची अमितेशकुमार माहिती घेत असतानाच त्यांना रऊफ यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचा परवाना असल्याची माहिती मिळाली. यावर त्यांनी तत्काळ त्यांचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी नव्याने तारीख दिली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली लोकअदालत सुमारे चार तास चालली.

प्रकरण दिवसांत मिटणार
वाळूज परिसरातील हाउसिंग सोसायटीचे प्रकरण अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. यात जमिनीच्या मालकी हक्काचा वाद सुरू आहे. पोलिस आयुक्तांसमोर हे प्रकरण आल्यानंतर दोन्ही बाजू एेकून सात दिवसांत हे प्रकरण निकाली काढण्याचे आश्वासन बांधकाम व्यावसायिकाने दिले.
बातम्या आणखी आहेत...