आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटाक्यांच्या आवाजाची क्षेत्रनिहाय चाचणी घेणे अशक्य : डाॅ. संगेवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीपूर्वी दरवर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने फटाक्यांच्या आवाजाच्या चाचण्या घेतल्या जातात. यंदाही घेण्यात आलेल्या चाचणीत सर्व फटाके उत्तीर्ण झाले. यामुळे या चाचण्या केवळ औपचारिकता असल्याची सातत्याने टीका होते. याबाबत मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ.जे.बी.संगेवार यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे

Q- फटाक्यांच्या आवाजाच्या चाचण्या किती विश्वासार्ह?
A- १०० टक्के विश्वासार्ह असतात. आम्ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतो. त्यांनी ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणेच चाचण्या घेतो.

Q- दिवस, रात्र, रहिवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि सायलेन्स झोन अशा प्रकारांत आवाजासाठी वेगवेगळ्या मर्यादा आहेत. तुम्ही मात्र केवळ दिवसाच चाचणी घेता. यातील निष्कर्ष सर्व परिस्थितीत कसे लागू होतील?
A- दिवसा वेगळी, रात्री वेगळी किंवा व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रात चाचण्या घेणे आम्हाला शक्य नाही; पण आम्ही १२५ डेसिबलच्या पुढील आवाजाच्या फटाक्यांवर बंदी आणतो. आमच्या अखत्यारीत जेवढे आहे तेवढे करतोच.

Q- मंडळाच्या निकषांप्रमाणे व्यावसायिकमध्ये ५५ तर निवासी भागात ४५ डेसिबलच्या पुढील आवाज ध्वनी प्रदूषण ठरते. मग, फटाक्यांसाठी १२५ डेसिबलचे निकष का?
A- हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निकष आहेत. दुसरी बाब म्हणजे फटाक्यांंचा आवाज सलग नसतो. तो एका क्षणाचा आवाज असताे. त्यास इंम्पल्स म्हणतात. त्याचा परिणाम फार तर एक सेकंद टिकतो. यामुळे येथे मर्यादा वेगळ्या आहेत.

Q- वेगवेगळ्या जागेवर आणि वेळेत प्रदूषणाचे प्रमाण कमी-जास्त होते. दिवाळीला तुमच्याकडून अशा विविध परिस्थितीत चाचण्या घेतल्या जातात का?
A- आम्ही जास्तीत जास्त अचूक चाचण्या घेण्याचा प्रयत्न करतो. तरी १० डेसिबल कमी-जास्त होऊ शकते.

Q- आवाजाच्या चाचण्या घेता; पण हवेच्या चाचण्यांचे काय?
A- आम्ही शहरात ४ ठिकाणी याचे मोजमाप करतो. चारही ठिकाणी २४ तास ही यंत्रणा कार्यरत असते. दिवाळीनंतर आम्ही आवाज आणि हवेच्या प्रदूषणाचा अहवाल प्रकाशित करतो.
{मुलाखत : महेश जोशी
 
बातम्या आणखी आहेत...