आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Firoz Khan Beaten In Aurangabad In Front Of Asduddin Owaisi

तिकीट का दिले नाही? असे विचारणार्‍या फिरोज खान यांना ओवेसींसमोर बेदम मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या समक्ष नाराज कार्यकर्ते फिरोज खान (३१, रा. लेबर कॉलनी, फाजलपुरा) यांना बेदम मारहाण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास हर्षनगर येथे घडली. फिरोज खान यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. दरम्यान, विनापरवानगी सभा घेतल्याच्या कारणावरून जावेद कुरेशी यांच्यावर अाचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षनगर येथे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष आणि वाॅर्ड क्रमांक ११ चे उमेदवार जावेद कुरेशी यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी, आमदार इम्तियाज जलील आणि एमआयएमचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. उद्घाटनानंतर खान आणि त्यांचे समर्थक घटनास्थळी आले. त्यांनी ओवेसींकडे तिकीट का दिले नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली. खान यांचे म्हणणे ऐकून ओवेसी कारमध्ये बसून निघण्याच्या तयारीत असतानाच जावेद कुरेशी यांच्या समर्थकांनी खान यांना मारहाण केली. यात त्यांचे कपडे फाटले. ओवेसींनी धाव घेऊन कार्यकर्त्यांना शांत केले. आपल्या गाडीत फिरोजला बसवून लेबर कॉलनी येथील त्यांच्या घरी सोडले. त्यानंतर त्याला उपचारासाठी घाटीत नेण्यात आले. तेथेही मोठा जमाव जमला होता. पक्षाचे आमदार आणि अध्यक्षांसमोर कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
आईसाठी मागितली होती उमेदवारी
फिरोजखान राहत असलेला वाॅर्ड क्रमांक २३ चेलीपुरा काचीवाडा हा महिला राखीव झाला होता. त्यांनी आईसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.
पुढील स्लाईडवर पाहा, कुरेशी यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या एमआयएम अध्यक्ष ओवेसी यांची छायाचित्रे...