आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत; नवापूरात बैलगाडीतून तर गेवराईत रथातून मिरवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुकुल मंदिर शाळाए बैलगाडी मिरवणूक - Divya Marathi
मुकुल मंदिर शाळाए बैलगाडी मिरवणूक
औरंगाबाद- शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गेवराईतील शाळेत विद्यार्थ्यांचे चक्क रथातून मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. नवापूरात बैलगाडीतून मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
 
सोलापुरात असे झाले स्वागत
सोलापुरात विद्य़ार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आली. शाळेच्या भितीची जागा आता उत्सुकतेने घेतली असल्याचे जाणवत होते. आदिवासीबहूल नंदुरबार जिल्ह्यात विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांचा उत्साह दिसून येत होता. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊचे, पुस्तकांचे आणि दप्तरांचे वाटप करण्यात आले. शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...