आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Do Work Then We Think For Post Said Ovesi Leader

आधी काम करा, पदांचे नंतर बघू, ओवेसींचा महिला नेत्यांना सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमआयएम पक्षात पदापेक्षा काम महत्त्वाचे आहे, असे सांगत आधी कामाला लागा नंतर पदाचे काय आहे ते बघू, अशा सूचनावजा सल्ला एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन आेवेसी यांनी महिला नेत्यांना दिला. यामुळे महिला नेत्यांनीही जास्तीत जास्त महिलांना पक्षात सामावून घेण्यासाठी कामकाज सुरू केले.
महापालिका निवडणुका तोंडावर आल्यामुळे पक्षाची कार्यकारिणी लवकर जाहीर केल्यास कामाला लागता येईल, असे महिला कार्यकर्त्यांनी खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सांगितले. ओवेसींनी सर्व महिलांचे म्हणणे ऐकून घेऊन आपल्याला काम महत्त्वाचे आहे. पद घेऊनच काम होते का? पद नसले तर आपण सर्वसामान्यांचे काम करू शकत नाही का? असे प्रश्न उपस्थित करीत काम करणाऱ्यांना पदाची गरज नसते, असे सांगून कार्यकारिणीही तयार करा, परंतु पक्षाची ताकद वाढवा, असा सल्ला दिला.

काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच इतर पक्षात काम करणाऱ्या महिला नेत्या व कार्यकर्त्यांना एमआयएममध्ये प्रवेशासाठी संपर्क केला जात आहे. काही महिला नेत्याही एमआयएममध्ये प्रवेश करत आहेत. कार्यकारिणी जाहीर होण्यासाठी उशीर होत असल्यामुळे काही महिला नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यकारिणीच जाहीर झाली नाही, त्यामुळे काम करण्यासाठी अडचणी येतात. काही शासकीय कार्यालयात जाताना पक्षाचे कोणतेही पद नसल्यामुळे थोडा विचार करावा लागतो,
असेही काही महिला नेत्यांचे म्हणणे आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनाही कार्यकारिणी जाहीर करा, अशी गळ घालण्यात आली. आमदारांनीही कार्यकारिणी संदर्भात थोडे थांबा, असे महिला नेत्यांना आश्वासन दिले.