आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाधी तासभर ‘याेगा’; नंतर कामाला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पहाटे साडे सहाची वेळ. फर्स्ट शिफ्टला वाळूजच्या सर्व कारखान्यांत यंत्रांची धडधड सुरू झालेली असते. पण एक कारखाना असा आहे, जेथे कामगार येताच कपडे बदलून, हातपाय धुऊन हाफ पँट-टी शर्ट घालून योगासनासाठी सज्ज होतात. अर्धा तास शिस्तीत योगाभ्यास करतात. अनुलोम विलोम करून मन प्रसन्न झाले की चहा लाइट नाष्टा करूनच कामास प्रारंभ करतात.

वाळूजमधील बी सेक्टरमध्ये कृपा टेक्नॉलॉजी या कारखान्यातील हा अनोखा प्रकार आहे. एका छोट्या कंपनीत हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. कृपा टेक्नॉलॉजी ही कंपनी तुकाराम पोतले यांनी आठ वर्षांपूर्वी सुरू केली. स्वत: बजाजमध्ये कामगार म्हणून काम केल्याने कामगारांची एनर्जी लेव्हल वाढवण्यासाठी योगाभ्यास गरजेचा असल्याची जाणीव त्यांना झाली. कंपनीत आल्याबरोबर त्यांना कामाला जुंपण्यापेक्षा योगाभ्यास, नाष्टा दिला पाहिजे ही केवळ कल्पनाच डोक्यात आली नाही तर त्यांनी ती प्रत्यक्षात राबवण्याचे ठरवले. २०१४ च्या हिवाळ्यात ही सुरुवात झाली तेव्हा कामगारांना कल्पना प्रथम रुचली नाही, पण पोतले यांनी पिच्छा सोडला नाही. त्यांनी कामगारांसाठी टी शर्ट आणि हाफ पँट असा ड्रेस आणला अन् दररोज सकाळी फर्स्ट शिफ्टला आल्यावर योगाभ्यास सुरू झाला. कंपनी मालकांनी योग ट्रेनरकडून हा योगाभ्यास शिकवला. तीन वर्षांपासून ही तर दिनचर्याच झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...