आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला १० जुलैपासून खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार सोमवारी सायंकाळी वाजता प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. गरड यांनी दिली. 

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमधील वाढती स्पर्धा कमी व्हावी, सामान्य विद्यार्थ्याला न्याय मिळावा या उद्देशाने मुंबई, पुणेच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीचे प्रवेश २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन करण्यात आले आहेत. ही प्रवेश प्रक्रिया जूनपासून सुरू करण्यात आली होती. त्यात एकूण २० हजार ९०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मनपा हद्दीतील १०४ महाविद्यालयात एकूण २२ हजार ९४० जागांसाठी प्रवेश दिले जात आहेत. कोट्यातील प्रवेश संबंधित महाविद्यालयात ३० जूनपासून सुरू करण्यात आले होते. 

आता मुख्य प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात येणार अाहे. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना ११ ते १३ जुलैदरम्यान सकाळी १० ते वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. त्यानंतर १४ जुलै रोजी रिक्त जागांचा तपशील पहिल्या फेरीनंतरचे कट ऑफ सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...