आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये बनली देशातील पहिली प्रीमियम बायसिकल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - येथील तरुण उद्योजक सौरभ भोगले यांच्या वाळूज येथील उमा सन्स कंपनीने देशातील पहिली प्रीमियम बायसिकल तयार केली आहे. तब्बल तीन वर्षे संशोधन करून ही सायकल अॅडव्हांटेज महाराष्ट्र या उद्योग प्रदर्शनात प्रथमच सादर केली. ती पाहण्यासाठी प्रदर्शनात गर्दी होत आहे. 
 
कलाग्राममध्ये महागड्या सायकलींचा स्टॉल लक्ष वेधून घेत आहे. अॅल्युमिनियमची फ्रेम असल्याने सायकलचे वजन फक्त ११.८ किलो आहे. सायकलमध्ये कुठेही जाॅइंट नाही. एकसमान फ्रेममध्ये ती तयार केली आहे. सायकलला हायड्रोलिक डिस्कब्रेक आहेत. यात मिनरल आॅइल वापरले आहे. 

मोटारसायकल सारखे शाॅकअप्स : यासायकलमध्ये हँडलखाली मोटारसायकलसारखे दोन शाॅकअप्स आहेत. त्याला एअर बेस सस्पेन्शन (एबीएस) म्हणतात. यात डिस्क ब्रेक आहेत. अर्जंट ब्रेक लागतो. 

मेडइन औरंगाबाद : सध्या या सायकलचे काही भाग तैवान येथून मागवले जात आहेत. कारण अॅल्युमिनियम अलाय हा प्रकार तेथेच तयार होतो. पण येत्या काही महिन्यांत हे अलाय औरंगाबादेत तयार करून शंभर टक्के मेड इन औरंगाबाद अशी ही सायकल होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या सायकलची बुकिंग थेट वाळूज येथील कंपनीत वेबसाइटवर सुरू आहे. 

सौरभ भोगले यांच्या कल्पनेतून तब्बल तीन वर्षांच्या संशोधनातून देशातील पहिली प्रीमियम बायसिकल तयार करण्याचा मान उमा सन्स कंपनीने मिळवला आहे. सायकलला मोटारसायकलसारखे शाॅकअप्स अन् डिस्कब्रेक आहे. यात शोधन आणि स्नायू अशा दोन प्रकारच्या सायकली केल्या आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...