आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत सिंचनाचे प्रमाण आमच्याकडे कमी असल्याने औरंगाबाद व जालना जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाचे पाणी कसे अडवता येईल यासाठी भविष्यात मोठय़ा प्रमाणात आमदार या नात्याने काम करणार असल्याचे मत आमदार सुभाष झांबड यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार झांबड यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी वार्तालाप करताना झांबड म्हणाले, मी माझ्या अजेंड्यामध्ये 15 कलमी कार्यक्रम आखला आहे. त्यात सिंचनाचा प्रश्न अग्रक्रमावर आहे. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर आणि वैजापूर हे दोन तालुके सर्वाधिक अवर्षणग्रस्त आहेत. या तालुक्यांमध्ये पाणी अडवण्यासाठी वृक्ष लागवडीचा विशेष उपक्रम राबवणार आहे. सिंचनाचे जास्तीत जास्त प्रकल्प सुरू करून बहुतांश शेतजमीन सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न राहील.
अन्यायी कायद्याला विरोध : पाणीप्रश्नावर समिती नेमून अन्याय करणार्या कायद्यांना विरोध करू. पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांप्रमाणे लॉबिंग करण्याऐवजी आपण थेट सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवू असे उत्तर त्यांनी या वेळी उपस्थित केलेल्या प्रश्नाला दिले.
नहर- ए- अंबरीची दुरुस्ती करणारच
नहर- ए- अंबरीतून किमान अडीच लाख लोकांना पाणीपुरवठा होऊ शकतो. त्या दिशेने सव्र्हेचे काम सुरूही आहे. महापालिकेने नहरीची नेमकी कोणती दुरुस्ती करायची यासाठी तांत्रिक अहवाल मागितला आहे. तो तयारही केलेला आहे. त्यामुळे माझ्या कार्यकाळात नहर-ए-अंबरीतून शहरात पाणीपुरवठा होणारच यासाठी मी पुरेपूर प्रयत्नशील आहे. प्रसंगी नहरीच्या दुरुस्तीचा खर्च मी स्वत:च्या खिशातून करणार, असा निर्धारही झांबड यांनी या वेळी बोलून दाखवला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.