एक पाऊस पडला की शहरभरातील रस्त्यांवर तळी साचतात. ही बाब औरंगाबादकरांसाठी नवीन नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांत पॅचवर्क आणि व्हाइट टॉपिंगचे रस्ते तयार करण्यात आले. त्यावरही मधोमध आणि काठाला पाणी साचले आहे. शुक्रवारी अर्धा तास झालेल्या एकाच पावसाने पालिका आणि ठेकेदाराच्या इंजिनिअरिंगची पोलखोल केली आहे. खड्ड्यांतही पाणी नवीन रस्त्यांवरही पाणीच राहणार असेल तर पैसा काय ठेकेदारांची तुंबडी भरण्यासाठी खर्च करता का, असा सवाल नागरिक करत आहेत. तांत्रिक बाबी ध्यानात घेताच रस्त्यांचे काम केले जाते. पुन्हा पुन्हा पाणी साचते आणि पुन्हा पुन्हा कामे काढली जातात. खाबुगिरीची कायम सोय व्हावी म्हणूनच हा प्रकार केला जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शहरवासीय देत आहेत. रस्त्यांच्या कामांमध्ये मुरणारे पाणी थांबवणे हे पालिका आयुक्तांपुढील मोठे आव्हान असणार आहे.
शहरात कुठल्याहीरस्त्यासाठी स्ट्रॉम वॉटर यंत्रणा नाही. त्यामुळे पाणी वाहून जाऊ शकत नाही. त्यामुळेच दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या पाहायला मिळते. जेथे खोलगट भाग आहे तेथे निचरा होता हे पावसाचे पाणी साचून राहते. त्यासाठी ही यंत्रणा असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे साऱ्याच समस्या सुटतील. अर्थात, ही स्ट्रॉम वॉटर यंत्रणाही तितकीच चांगली उभारणे आवश्यक आहे. त्यातूनच रस्त्यांची निगाही चांगली राखली जाईल, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे. मात्र, रस्त्यांना स्लोप नीट ठेवल्याशिवाय या यंत्रणेचाही उपयोग होणार नाही.
पाहा पावसाने कशी शहराचे दाणादण केले..