आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरिंगच्या पहिल्या फेरीसाठी उद्या जागावाटप, औरंगाबादेतील 13 हजार 44 विद्यार्थ्यांची नोंदणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - इंजिनिअरिंग पदवी प्रवेशासाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची सोमवारी अंतिम मुदत होती. यंदा औरंगाबादेतील १३ हजार ४४ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून पहिल्या प्रवेश फेरीसाठीच्या जागांचे वाटप बुधवारी (२८ जून) संकेतस्थळावर करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
 
राज्यातील इंजिनिअरिंग प्रथम वर्ष प्रवेशासाठी जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली. २६ जून ही पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी सुटीच्या दिवशीही एआरसी सेंटरवर हजेरी लावली होती. २२ जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा देण्यात आली होती.
 
आता २८ जून रोजी संकेतस्थळावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी जागांचे वाटप जाहीर करण्यात येईल. ज्यात एकूण जागा, रिक्त जागा आणि कॉलेजामधील प्रवेश क्षमताही संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. त्यानंतर पहिल्या फेरीसाठी विद्यार्थ्यांनी एआरसी सेंटरला जाऊन २९ जून ते जुलैदरम्यान प्रवेशनिश्चिती करायची आहे. यानंतर पहिल्या फेरीतील उर्वरित रिक्त जागांची माहिती जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
 
प्रवेश क्षमता अशी
३७७ -महाविद्यालये राज्यात
१ लाख ५२ हजार १०० - प्रवेश क्षमता
३४- महाविद्यालये मराठवाड्यात
१२ हजार ४८२ - प्रवेश क्षमता
१५- महाविद्यालये औरंगाबादेत
६ हजार २६२ - प्रवेश क्षमता
बातम्या आणखी आहेत...