आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोसमात पहिल्यांदाच औरंगाबादमध्‍ये अतिवृष्टी, पाहा पावसाने घातलेला थैमान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको बसस्थानकाकडे जाणाऱ्या रोडवरील दुपारी दोन वाजता पावसाचे टिपलेले दृश्य. छाया : अरुण तळेकर - Divya Marathi
सिडको बसस्थानकाकडे जाणाऱ्या रोडवरील दुपारी दोन वाजता पावसाचे टिपलेले दृश्य. छाया : अरुण तळेकर
औरंगाबाद - गेल्या महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेला मान्सून मंगळवारी (पाच जुलै) औरंगाबादेत खऱ्या अर्थाने जोरदार बरसला. सकाळी ८.३० ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत ६६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे यंदाच्या मोसमातील पहिली अतिवृष्टी नोंदवली गेली. त्यातील दुपारी साडेबारा ते अडीच या दोन तासात ३३ तर अडीच ते साडेपाच वेळेत २५ मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आबालवृद्धांनी सरी अंगावर घेण्याचा आनंद लुटला. दरम्यान, सखल भागातील अनेक वसाहतीत, घरात पाणी शिरले. वीज पुरवठा खंडित झाला होता. खाम, सुखना नदीत थोडेसे पाणी आले होते.
पुनर्वसू नक्षत्र लागताच पावसाची दमदार हजेरी लागेल, असे भाकित हवामान तज्ज्ञांच्या हवाल्याने दिव्य मराठीने प्रसिद्ध केले होते. ते खरे ठरले. मंगळवारी सकाळी आकाशात पांढऱ्या ढगांचीच दाटी होती. त्यामुळे गेला महिनाभर जे झाले तेच आजही होईल, असे वाटत होते. मात्र, साडेबाराच्या सुमारास पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्याने काळे ढग आणले. आणि पाहता पाहता पावसाचा वेग वाढत गेला.

येथे घरात शिरले पाणी
> जवाहरकॉलनी > गारखेडा परिसर > जयभवानीनगर > श्रेयनगर > निराला बाजार > कोकणवाडी > झांबड इस्टेट > क्रांती चौक > कटकट गेट > जाधववाडी > सेव्हन हिल्स > उस्मानपुरा कोहिनूरनगर > रेल्वेस्टेशन परिसर > बीड बायपास > पैठण रोड > मुथियान कॉर्नर. > रेल्वेस्टेशन > कोहिनूर > पुंडलिकनगर.

दोन झाडे पडली
कोशागार कार्यालयासमोर, पुंडलिकनगरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ झाडे पडली. अग्निशमनच्या जवानांनी ती हटवून वाहतूक सुरळीत केली.

गेल्या वर्षी काय‌?
औरंगाबादशहरात 5 जुलैपर्यंत सरासरी १६६.९६ मिमी पाऊस अपेक्षित असतो. गेल्या वर्षी 6 ते २० जूनदरम्यान औरंगाबादेत १७३.८३ मिमी पाऊस पडला होता. म्हणजे 4 टक्के जास्त पाऊस २० जूनपर्यंतच पडला होता; पण त्यानंतर पाच आठवडे पाऊस गायब झाला होता. परिणामी खरिपाची पेरणी वाया जाऊन दुष्काळाचे सावट पसरले. उत्पादनात ६० ते ८० टक्क्यांपर्यंत घट आली होती.

पुनर्वसू नक्षत्र सांगते
वाहन कोल्हा आहे. रवी, चंद्र, गुरू, शुक्र ग्रह जलनाडीत. अतिवेगातील वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. ते १० आणि १६, १७ जुलैला पावसाची दमदार हजेरी होईल.

मराठवाड्यातील चित्र
यंदाएक जून ते जुलैपर्यंत िहंगोली जिल्ह्यात २१०, परभणी १६०.६१, जालना १६६,६२, नांदेड २०९.२२, लातूर १७६.८६, उस्मानाबाद १८६.१३ मिमी पाऊस झाला असताना औरंगाबाद जिल्ह्यात १५८.५४ (औरंगाबाद शहरात १३८.६, तर शहर, तालुक्यात १६१.३१, बीड जिल्हा १५४ मिमी) एवढाच पाऊस झाला होता. त्यामुळे औरंगाबाद शहरात चिंतेचे वातावरण होते. त्यांना मंगळवारी पुनर्वसूच्या मुसळधार सरींनी दिलासा दिला.
पुढे वाचा.. २४ तासांची आकडेवारी व पाहा पावसाचे छायाचित्रे
बातम्या आणखी आहेत...