आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पहिल्यांदाच 74 वर्षीय व्यक्तीचे यशस्वी अवयवदान, कुटुंबाची इच्छाशक्ती होती तीव्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवयवदानाच्या प्रक्रियेवेळी विमनस्क झालेले कुटुंबीय - Divya Marathi
अवयवदानाच्या प्रक्रियेवेळी विमनस्क झालेले कुटुंबीय
औरंगाबाद-  जानेवारी २०१६ ला राम मगर या तरुणाचे अवयवदान झाले अन् शहरात अवयवदानाची चळवळच सुरू झाली. आतापर्यंत ते अवयवदान करून औरंगाबाद मुंबई-पुण्यापेक्षा अधिक अवयवदान करणारे शहर ठरले. बुधवारी यात आणखी एका अवयवदानाची भर पडली. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एका वयस्कर म्हणजे ७४ वर्षीय व्यक्तीचे अवयवदान यशस्वी करण्याचा मान शहराने मिळवला आहे. 

जिंतूरचे रहिवासी असलेले अॅड. बाळासाहेब देशमुख ३० एप्रिल रोजी चक्कर येऊन पडले. त्यांना माणिक रुग्णालयात हलवण्यात आले. मे रोजी मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. मकरंद कांजळकर आणि टीमने ते ब्रेनडेथ असल्याची सूचना कुटुंबीयांना दिली अन् अवयवदानाचा प्रवास सुरू झाला. माणिक रुग्णालयातील ही पहिलीच घटना आहे. अॅड. देशमुख भाचीच्या विवाह कार्यासाठी सूर्या लॉन्स पाहण्यासाठी नातेवाइकांसोबत ३० एप्रिलला सायंकाळी च्या सुमारास गेले होते. त्याठिकाणी त्यांना चक्कर आली होती. तपासणीनंतर ब्रेन हॅमरेज असल्याचे स्पष्ट झाले. पुण्यातील मुलगा विक्रम देशमुख यांनी तत्काळ अवयवदानासाठी इच्छा प्रदर्शित केली अन् पुढील प्रक्रिया सुरू झाली. देशमुख यांचे यकृत पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात तर किडनी शहरातील रुग्णालयात प्रत्यारोपित केली जाणार आहे. 

मित्राच्या पत्नीमुळे अवयवदानाचे महत्त्व कळाले...
माझ्या मित्राच्या पत्नीच्या किडनी निकामी झाल्या आहेत. एकदा प्रत्यारोपण झाले. मात्र, नंतर जंतुसंसर्ग झाल्याने किडनी पुन्हा काढावी लागली. गेली अनेक वर्षे त्यांना डायलिसिस सुरू आहे. मित्राच्या वेदना अगदी जवळून अनुभवल्या असल्याने अवयवदानाबद्दल मी सकारात्मक होतो. 

जीवनानंतरही मानवतेची सेवा...
माझे आजे सासरे स्वातंत्र्यसैनिक होते. माझ्या सासऱ्यांनीही समाजकार्यात मोलाचे योगदान दिले. जिवंत असताना प्रत्येकाला शक्य ती मदत केली. आज मरणोत्तरही सेवेचे व्रत निभावले. 
 
या डॉक्टरांची होती टीम...
सह्याद्री रुग्णालयाचे डॉ. अनुराग श्रीराम, डॉ. राहुल सक्सेना तर माणिक रुग्णालयाचे भास्कर मुसांडे, डॉ. अभय महाजन, डॉ. शरद सोमाणी, डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. माणिक देशपांडे, डॉ. सुहास बावीकर, डॉ. समीध पटेल, डॉ. उल्हास कोंडापल्ले आणि डॉ. मकरंद कांजळकर या टीमने यशस्वी अवयवदान केले. 
 
 
पुढील स्लाइडवर वाचा तज्ञ काय म्हणाले...?
बातम्या आणखी आहेत...