आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पहिल्यांदाच होणार महिलेचे अवयवदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदाच्या वर्षात शहरात अवयवदानाला सुरुवात झाली. राम मगरचे जानेवारी महिन्यात अवयवदान झाले अन् शहरासाठी अवयवदानाचा महामार्ग खुला झाला. सुनील बुधवंत, रामभाऊ उबाळे आणि घाटीतील गणेश घोडके यांच्या यशस्वी अवयवदानानंतर मंदाबाई किसन गाढवे या ५५ वर्षीय महिलेचे अवयवदान होणार आहे. १८ मार्च रोजी त्यांना अपघात झाला होता. तेव्हापासून एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यांचा मेंदू मृत झाल्याने नातेवाइकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आहे. सोमवारी मध्यरात्री अवयवदानाची प्रक्रिया सुरू होईल. पहाटेच्या सुमारास अवयवांचा प्रत्यारोपणासाठी प्रवास सुरू होईल. मंदाबाईंचे वय लक्षात घेता हृदयाचे प्रत्यारोपण केले जाणार नाही.
बातम्या आणखी आहेत...