आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅप कॅमेऱ्याने टिपले कृष्णमृग काळवीट जोडीचे पहिले छायाचित्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरूर- वन्यजीवांच्या संरक्षणाबरोबरच शिकारी, तस्करांवर पाळत ठेवण्यासाठी बीडच्या वन विभागाने तालुक्यातील तागडगावच्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या पाणवठ्यावर अत्याधुनिक स्वयंचलित ट्रॅप कॅमेरे बसवले असून या ट्रॅप कॅमेऱ्याने पाणवठ्यावर तृष्णा भागवण्यासाठी आलेल्या कृष्णमृगाच्या जोडीचे पहिले छायाचित्र टिपले आहे. 

वन्यप्राण्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी बीडचे विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांनी आधुनिकतेची कास धरून पाणवठ्यावर ट्रॅप कॅमेरे बसवले आहेत. हा कॅमेरा १०० फुटांपर्यंत जंगलातील बारीकसारीक बाबींवर नजर ठेवणार आहे. दिवस-रात्र हा कॅमेरा जंगलातील वन्यजीव त्यांचे शिकारी तस्करांवर करडी नजर ठेवून चेहरे टिपत आहेत. ज्या ठिकाणी कॅमेरा असेल त्या परिघातून कुणीही गेल्यास क्षणाचाही विलंब होता ते चित्रबद्ध होत आहे.

छायाचित्र टिपताना वन्यजीव, शिकाऱ्यांना त्याची कुठलीच कल्पना येणार नाही असे या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या कॅमेऱ्यात टायगर सेटिंग असून कॅमेऱ्याच्या परिघातून वन्यप्राणी गेल्यास ते मिनिटांपर्यंत सलग छायाचित्रे काढता येतात. व्हिडिओही काढले जातात. यात जीबी एवढ्या क्षमतेचे मेमरी कार्ड असल्याने मोठ्या प्रमाणात छायाचित्र, व्हिडीओची साठवणूक होते. 
बातम्या आणखी आहेत...