आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्मार्ट' सल्लागार होण्यासाठी पाच संस्था उतरल्या स्पर्धेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात समाविष्ट झालेल्या महापालिकांसाठी राज्य सरकार स्मार्ट सिटी योजना राबवणार असून त्यासाठी औरंगाबादसह सहा पालिकांना सिडकोच्या माध्यमातून १०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सल्लागार संस्था नेमण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून आज मनपाने दोन संस्थांची सादरीकरणे पाहिली. आणखी तीन सादरीकरणे पाहिल्यावर मनपा निर्णय घेणार आहे.

पहिल्या टप्प्यात पुणे व सोलापूर ही राज्यातील दोन शहरे केंद्राच्या योजनेत निवडली गेली. आता शहरांच्या विकासासाठी राज्याने स्मार्ट सिटी योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून उर्वरित अाठपैकी सहा शहरांना आता केंद्र निधीऐवजी राज्यच निधी देईल. पण थेट राज्य सरकारकडून प्रति मनपा १०० कोटी रुपये देता एमएमआरडीए सिडकोतर्फे निधी दिला जाणार आहे. एसपीव्हीची स्थापना केल्यानंतर पहिल्या वर्षी ५० कोटी रुपये दिले जाणार आहेत. स्मार्ट सिटीची ही प्रक्रिया आता गतिमान होत असताना औरंगाबाद मनपानेही आपल्या हालचालींना वेग दिला आहे. पीएमसी म्हणून फोर्ट्रेसची आधीच निवड करण्यात आलेली आहे.
केंद्राच्या यादीतूनच निवड
आताप्रकल्प सल्लागार संस्था नेमावयाची असून त्यासाठी केंद्राने पाच संस्थांची यादी तयार केली आहे. त्या संस्थांची सादरीकरणे पाहून आपापल्या शहराच्या गरजेनुसार योग्य अशा संस्थेची निवड मनपाला करावयाची आहे. आज आयुक्त ओमप्रकाश बकोरिया मनपाच्या अधिकाऱ्यांनी दोन संस्थांची सादरीकरणे पाहिली.
बातम्या आणखी आहेत...