आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकात्मता रॅलीसाठी शाळा बंद, पाच किलोमीटरची पायपीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- परिक्षेत्रपोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची मर्जी राखण्यासाठी शहरातील पोलिस दलाने कंबर असल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रीय एकात्मता रॅलीसाठी तालुक्यातील अनेक ठिकाणांहून विद्यार्थ्यांना शहरात टेम्पोत भरून आणण्यात आले. दरम्यान शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यात पाच किलोमीटरच्या रॅलीदरम्यान उपाशीपोटी विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागल्याने विद्यार्थी हिरमुसले होते.
शिक्षण विभागाची परवानगी घेता गटविकास अधिकाऱ्यांनी पोलिसांचा अजंेडा राबवला. सोमवारी सकाळी औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलाने राष्ट्रीय एकात्मता रॅलीचे आयोजन केले. रॅलीच्या आयोजनासाठी शहर,तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात आले. सकाळी नऊ वाजेपासून विद्यार्थ्यांना शहरातील प्रियदर्शनी चौकात आणून बसवण्यात आले होते. सिल्लोडमध्ये येण्यासाठी सोयगाव,अजिंठा, उंडणगाव आदी भागातील विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजेपासून शाळेत यावे लागले होते. कार्यक्रम संपवून घरी जाण्यासाठी त्यांना दुपारी दोन वाजल्याने ते भुकेले झाले होते. त्यांना सिल्लोडमध्ये आणण्यासाठी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे सहकार्य घेऊन विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील शाळांमधून आणण्यात आले. एकतेचा संदेश देणारी भाषणे झाल्यानंतर त्यांना रॅलीसाठी शहरातून पाच कि.मी.ची पायपीट करावी लागली. थकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत बसवण्यात आले. रॅली दरम्यान पाय दुखत असल्याची तक्रार अनेक विद्यार्थिनींनी केली. अजिंठ्यासह तालुक्यातील विविध गावांच्या शाळांमधून आलेल्या शिक्षकांनी वाहनांची व्यवस्था पोलिसांनी केल्याचे सांगितले.
पोलिसांच्या इच्छेखातर शाळा बंद करून विद्यार्थ्यांना रॅलीत सहभागी करण्यास मी गटशिक्षण अधिकाऱ्यांना सांगितले होते. असे करण्यासाठी मला वरून आदेश होते. मनोजचौधर, गटविकास अधिकारी

माहिती घेऊन सांगू
शाळाबंद करून विद्यार्थ्यांना कार्यक्रमात घेऊन जाता येत नाही. सिल्लोडमधील कार्यक्रमासाठी शाळा बंद करण्यासंदर्भात कुणीही बोलले नाही.चांगला कार्यक्रम असल्यास स्थानिक पातळीवर निर्णय असू शकतो. मी माहिती घेतो. भगवानसोनवणे, गटशिक्षण अधिकारी, माध्यमिक
कार्यक्रमाची कल्पना नव्हती

जिल्हापरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित चौधरी शिक्षण अधिकारी माध्यमिक भगवान सोनवणे या दोघांनाही कार्यक्रमाची कल्पना नसल्याचे सांगितले. परंतु गटविकास अधिकारी मनोज चौधर सांगतात त्याप्रमाणे त्यांना वरून कुणाचे आदेश होते. ते वर कुणाचे ऐकतात हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांना रॅलीत सहभागी करण्यास मला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज चौधर यांनी तोंडी आदेश दिले होते. बी.के.खरात,गटशिक्षण अधिकारी.
राष्ट्रीय एकात्मता रॅलीसाठी अजिंठा, उंडणगावसह सोयगाव येथून प्रवासी वाहनात कोंबून विद्यार्थ्यांना रॅलीत सहभागी करण्यासाठी सिल्लोड शहरात आणण्यात आले होते. छायाचित्र: मकरंद कोर्डे