आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच महिन्यांपूर्वी गळफास घेतलेल्या महिलेचा घाटीत मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पाच महिन्यांपूर्वी गळफास घेतल्यामुळे जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. महिलेच्या नातेवाइकांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने घाटीत तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केल्याची माहिती देताच तणाव निवळला. 
 
सुनीता मिलिंद मस्के (३०, रा. नायगाव, वाळूज) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. १९ ऑक्टोबर २०१६ रोजी सुनीताने गळफास घेतल्याची माहिती तिच्या पतीने मेहुणा सासूस दिली होती. तेव्हापासून तिच्यावर घाटीत उपचार सुरू होते. रविवारी (२६ फेब्रुवारी) सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 
 
या घटनेची माहिती मिळताच तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी घाटीत गर्दी केली. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर वाळूज पोलिसांनी पती मिलिंद मस्के (३०), छाया म्हस्के (४७), अश्रुबा म्हस्के (६०), सुनील म्हस्के (३१, सर्व रा. नायगाव, ता. गंगापूर) उज्ज्वला नाना चाबुकस्वार (२८, रा. इंदिरानगर, गारखेडा) यांना अटक केल्याची माहिती वाळूज पोलिसांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...