आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातून मायलेकीसह पाच जण बेपत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - आई आणि तिच्या दोन मुलांसह शहरातून सहा जण बेपत्ता झाल्याची नोंद विविध पोलिस ठाण्यांत करण्यात आली आहे. भीमनगर भावसिंगपुरा येथील रहिवासी नंदा शेषराव नाडे (३५) या २८ मे रोजी घरात कोणालाही सांगता निघून गेल्या. त्यांच्याबरोबर १४ वर्षीय अंजली ही मुलगी, तर सात वर्षांचा कुणाल आहे. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. नंदा यांच्या अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस आहे. रंग काळासावळा असून चेहरा लांबट आहे, तर अंजलीचा रंग गोरा, चेहरा लांबट आहे. कुणालच्या अंगात पिवळ्या रंगाची पँट आहे. सदरील मायलेक कुणाला आढळल्यास छावणी पोलिस ठाण्याच्या ०२४०- २२४०५५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन छावणी पोलिसांनी केले आहे.
कोलठाणवाडीजवळील फातेमानगर येथील रहिवासी हमीद बुवाकर चाऊस हे पन्नासवर्षीय गृहस्थ २४ जुलै रोजी घरातून निघून गेले आहेत. ते मूळ श्रीरामपूरमधील झोपडपट्टी गल्ली क्रमांक येथील रहिवासी आहेत. त्यांची उंची पाच फूट, चेहरा लांब, रंग काळासावळा, दाढी वाढलेली असून अंगात काळ्या रंगाची पँट आहे. सदरील व्यक्ती कोणाला आढळल्यास हर्सूल पोलिस ठाण्याच्या ०२४०-२१००८५८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जमादार ए. व्ही. वाघ यांनी केले आहे. रमानगर येथील रहिवासी उषा गणेश गवळे (३५) ही महिला १८ जुलै रोजी घरातून निघून गेली आहे. तिने लाल रंगाची साडी परिधान केलेली आहे. सदरील महिला आढळल्यास उस्मानपुरा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, बेपत्‍ता नागरिकांची फोटो..