आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे वार्ता : सिडकोत चोरट्याने पाच तोळ्यांचे दागिने पळवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा चोरट्याने चांगलाच फायदा लुटला. घरासमोरून मिरवणूक जात असताना चोरट्याने घरमालकिणीलाच बाजूला सरका, असे म्हणत त्यांच्या घरात प्रवेश केला. चोरी करून पुन्हा त्यांना बाजूला सरका, असे म्हणत सर्वांसमक्ष पसार झाला. ही घटना रविवारी दुपारी १२ ते वाजेच्या सुमारास एन-९ सिडको येथील छत्रपती चौकात घडली.

सिडको एन-९ येथील प्रकाश सपकाळे हे रविवारी गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर सहकुटुंब उभे होते. १२ ते वाजेच्या सुमारास सुमारे २५ वर्षांचा तरुण गर्दीतून आला आणि त्याने सपकाळे यांच्या पत्नीला बाजूला सरकवून त्यांच्याच घरात प्रवेश केला. मात्र सपकाळे यांच्या पत्नी मिरवणूक पाहण्यात दंग होत्या. थोड्या वेळाने तोच तरुण त्यांच्या मागून आला पुन्हा सपकाळे यांच्या पत्नीला "बाजूला व्हा, मला रस्त्याच्या पलीकडे जायचे आहे,' असे म्हणाला. तेव्हाही हे कुटुंबीय मिरवणूक पाहण्यातच दंग होते. दरम्यान, सपकाळे यांचा मुलगा घरात गेला असता त्याला कपाट उघडे दिसले. त्याने लगेचच आईवडिलांना बोलावले. सपकाळे यांनी सिडको पोलिसांना फोन करून हकिगत सांगितली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत घराची पाहणी केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश अाघाव त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस घराची पाहणी करत असताना त्यांना चोरीला गेलेले काही सोने सामानात सापडले. तरीही सुमारे पाच ग्रॅम तीन तोळे सोने चोरीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे. तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.