आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Years Old Child Get Admission In First Standard

पाच वर्षांच्या बालकालाच मिळणार पहिलीत प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बालकांना नर्सरी आणि पहिलीत प्रवेश देण्यासाठी राज्य सरकारने किमान वयाची अट घातली अाहे. २०१६-१७ मध्ये किमान तीन वर्षे वयाच्या बालकाला नर्सरी तर पाच वर्षे पूर्ण झालेल्या बालकालाच पहिलीत प्रवेश दिला जाईल. त्यानंतर पुढील तीन वर्षे टप्प्याटप्प्याने प्रवेशाचे वय वाढवण्यात आले असून २०१९-२० या वर्षासाठी वर्षे पूर्ण झालेल्या बालकांनाच पहिलीला प्रवेश मिळणार आहे.

शालेय शिक्षण क्रीडा विभागाने २१ जानेवारी २०१५ रोजी जारी केलेल्या अध्यादेशात शाळा प्रवेशाबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर या अध्यादेशातील परिच्छेद क्रमांक मध्ये दुरुस्ती करत नवा अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार शिक्षण संचालक महावीर माने यांनी जानेवारी २०१६ रोजी एक परिपत्रक जारी करून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना शासनाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुरुस्तीनुसार शैक्षणिक वर्षाच्या ३१ जुलै या तारखेला नर्सरीसाठी किमान वर्षे तर पहिली प्रवेशासाठी किमान वर्षे वयाटी अट घालण्यात आली आहे.

संस्था येणार अडचणीत
शिक्षणसंचालकांच्या या नव्या आदेशामुळे शहरातील अनेक शाळा बालवाड्यांची अडचण होणार आहे. सध्या दोन ते अडीच वर्षाच्या बालकालाही प्ले ग्रुपमध्ये प्रवेश दिला जातो. अशा अनेक संस्था गल्लीबोळात सुरू झाल्या. मात्र या संस्थांमध्ये वयाची तीन वर्षे पूर्ण करणाऱ्या बालकांनाच यापुढे नर्सरीला प्रवेश देणे बंधनकारक आहे.
राज्यमंडळाच्या अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांत पूर्व प्राथमिक वर्गातील प्रवेशासाठी निश्चित अशी वयाची अट नव्हती. याचा विचार करून शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय समिती निश्चित करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी ३१ जुलैला वर्षे पूर्ण होणाऱ्या मुलांना चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश द्यावा लागणार आहे. तर पहिलीच्या प्रवेशासाठी टप्प्याटप्प्याने वयानुसार प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.
२०१७-१८ या वर्षात नर्सरी प्रवेशासाठी वर्षे तर पहिली प्रवेशासाठी वर्षे महिने अशी अट घालण्यात आली आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी नर्सरी वर्षे तर पहिलीसाठी वर्षे महिने वयाची अट आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी तर पहिलीसाठी सहा वर्षे पूर्ण वयाची अट निश्चित करण्यात आली आहे.
पुढे वाचा .. किमान वयाची अट...