आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण केले जाणार आहे. सकाळी ८.१५ वाजता त्यांचे शहरात आगमन होणार असून ते हुतात्मा स्मारक, सिद्धार्थ उद्यान येथे श्रद्धांजली अर्पण करतील. सकाळी वा. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करतील.
विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची शुक्रवारी दुपारी पाहणी केली. हुतात्मा स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली असून उद्यान गेट संबंधित परिसराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. परिसरात पावसाची शक्यता लक्षात घेता पत्र्यांचा मंडप उभारण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे, आमदार अतुल सावे, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, सुभाष झांबड, सतीश चव्हाण, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांची उपस्थिती राहील.

बातम्या आणखी आहेत...