आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवडीत आगीची मालिका; गोठे जळाले, पंचनाम्याचे आदेश, ग्रामस्थ भयभीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी- एकीकडे दुष्काळाचे संकट पाठीवर असताना दुसरीकडे दुपारच्या वेळी गोठ्यासह सांभाळलेल्या कडब्याच्या गंजीना आग लागण्याची मालिका वडवणी तालुक्यातील देवडीत आठ दिवसांपासून सुरूच असून कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तहसीलदारांच्या आदेशानुसार तलाठी मंडळअधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. शेतकऱ्यांचे दीड लाखाचे नुकसान झाल्याने रोजच्या घटनेमुळे चिंता व्यक्त केली आहे.

देवडीत एप्रील रोजी शेतकरी जग्गनाथ झाटे रमेश लोंढे यांच्या गोठ्यासह कडब्याला आग लागली. तर एप्रीलला वैजिनाथ झाटे यांचा कडबा भस्मसात झाला. आगीच्या तीन घटना ताज्या असतांनाच मंगळवारी दुपारी दोन वाजता गावातील शेतकरी श्रीधर कोल्हे, कुंडलीक विठोबा घोलप, हणुमंत ज्ञानदेव कोल्हे, विश्वनाथ म्हात्रे या चार शेतकऱ्यांच्या गोठ्यांना गंजींना आग लागली. गोठ्याववरील पत्र्यासह बैलगाडीचे औत, सुंब, कासरे, असे शेती अवजारे जळुन खाक झाल्याने एेन दुष्काळात शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.ही आग आटोक्यात येत नाही तोच दुपारी साडेतीन वाजता श्रीधर अंबोरे यांच्या गोठ्याला आग लागली. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेवुन ती आटोक्यात आणली.दरम्यान याच तालुक्यातील पुसरा येथे सोमवारी दुपारी बारा वाजता शेतकरी पुरूषोत्तम शेळके यांच्या गावालगत असलेल्या गोठ्यासह कडब्याच्या गंजीला आग लागुन २० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण काय हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

देशमुखांची तत्परता
मुंबईयेथील अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख हे बीड येथे आले होते. त्यांचे गाव असलेल्या देवडीतील घटनेची माहिती मिळताच त्यांनी गावात अग्नीशमन दलासाठी प्रयत्न केले.

देवडी येथील शेतकरी कुंडलिक घोलप यांच्या गोठ्याला मंगळवारी आग लागून शेती अवजारे भस्मसात झाली.

ग्रामस्थांचे झालेले नुकसान
शेतकरीसाहित्य नुकसान

जग्गनाथझाटे कडबा- ०८०००
रमेश लोंढे गोठा - ०३०००
वैजीनाथ झाटे कडबा- ०९०००
श्रीधर कोल्हे कडबा - ४००००
कुंडलिक घोलप अवजारे, गोठा- ३५०००
हणुमान कोल्हे गोठा- २४०००
विश्वनाथ म्हात्रे- कडबा- ४५०००

आगीची चौकशी व्हावी
घरसोडून काही शेतकरी घरासमोरच पटांगणात झोपत आहेत.आगीचे प्रकार का घडत आहेत.याची सखोल चौकशी करून गावात अग्निशामक दलाची व्यवस्था करावी.'' मच्छिंद्र झाटे, सदस्य,पंचायत समिती,

पंचनाम्या प्रमाणे मदत
देवडीतमंडळअधिकारी तलाठी यांना पाठवले आहे.पंचनामा करून त्या प्रमाणे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्यात येईल. आगीचे कारण स्पष्ट करण्यासाठी संबधीत यंत्रणेला पाचारण करू.'' अनंत सरवदे, तहसिलदार,वडवणी

शेतकऱ्यांना मदत द्या
माजलगावकारखान्याच्याअग्नीशामक दलाने लागलेली आग आटोक्यात आणली असुन मंडळअधिकारी तलाठ्याने गावात येवुन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. प्रत्येकी ५० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद शासन दफ्तरी आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदतीची गरज आहे.'' रेखा विश्वास आगे, सरपंच,

आगीचा प्रकार जाणीवपूर्वक
देवडी येथील ग्रामस्थ संदीपान घोलप, मच्छिंद्र लक्ष्मण पैठणे, भीमराव आश्रुबा झाटे,परमेश्वर झाटे यांच्याशी दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता गावात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जर आग लागत असेल तरी ती रोजच का लागते हा ही प्रश्न आहे. कोणीतरी जाणीव पुर्वक हे कृत्य करत असुन पोलिसांनी याचा छडा लावावा अशी मागणी त्यांनी केली.

नळयोजनेवर गावची तहान
पाच हजार लोकसंख्येच्या देवडीत जलस्वराज्य योजना राबवण्यात आली असुन गावात चारशे नळकनेक्शन धारक आहेत. दररोज पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी खंडीत वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळत नाही.पिण्यासाठी घरात भरलेले पाणी आग विझविण्यासाठी वापरण्यावी वेळ ग्रामस्थांवर आली आहे.