आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅट रो- हाऊसकडे नागरिकांचा कल, पैठण आता टाकतेय कात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- गगनाला भिडलेले जमिनींचे भाव, कमी जागा उपलब्धता यामुळे शहरीभागात फ्लॅट- रो-हाऊसकडे लोकांचा कल वाढला आहे. त्याचप्रमाणे याचे लोण आता तालुक्यातही पसरले असल्याचे चित्र दिसत आहे.

बिडकीन परिसरात होत असलेल्या डीएमआयसीमुळे संतांची भूमी व पर्यटननगरी म्हणून परिचीत असलेली पैठणनगरी आता कात टाकत असून ग्रामीण भागातील नागरिकांचा कल आता फ्लॅट- रो-हाऊसकडे असल्याचे दिसून येत आहे.

सध्या पैठण तालुक्यात फ्लॅट, रो-हाऊसला मोठी मागणी असल्याचे बिल्डर व्यावसायिकांचे म्हणणे आहे. शहरात सध्या शहराच्या चारही बाजूने रो हाऊस व फ्लॅटची कामे सुरू असल्याचे दिसत आहे. सुमारे दहा ते १२ ठिकाणी फ्लॅटची कामे सुरू आहे.

घर बांधण्यापेक्षा आयते घेतलेलेच बरे अशी शहरी विचारसरणी ग्रामीण भागात रुजत असल्याचे चित्र आहे. आज घडीला रो- हाऊस व फ्लॅट्स मोठ्या प्रमाणावर तयार होत असून १२ लाखांपुढे किमती आहेत. दोन वर्षांपूर्वी पाच लाखांत फ्लॅट्स उपलब्ध होत होते. आज याची किमत वाढली असून रो - हाऊसचा समावेश आहे.

प्रगतिशील शेतकऱ्यांत क्रेझ : दोन वर्षांपूर्वी पैठणमध्ये तयार झालेले फ्लॅट्सच्या किमती या पाच लाखांच्या घरात होत्या. आता याच किमती वाढल्या असल्या तरी काही सामान्य शेतकरी फ्लॅट्स घेताना दिसत आहेत तर बड्या शेतकऱ्यांत रो- हाऊसची क्रेझ पाहायला मिळत आहे. मात्र, या सहा महिन्यांपासून दुष्काळाचे सावट असल्याने अनेक शेतकऱ्यांनी फ्लॅटची बुकिंग केली असली तरी सध्या त्यांनी थांबणेच पसंत केले आहे.

डीएमआयसीने भाव वाढले
पैठण तालुक्यातील बिडकीन या ठिकाणी डीएमआयसी होत असल्याने बिडकीनमध्येही रो-हाऊस फ्लॅट्स उपलब्ध होत असले तरी बिडकीन भागातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी यात गेल्या ते शेतकरी रो हाऊसकडे वळले आहेत. परिणामी पैठण शहरातही नोकरदार व सर्वसामान्यतही रो-हाऊसची मागणी दिवसंेदिवस वाढत आहे.

औरंगाबाद शहराच्या तुलनेत स्वस्त
औरंगाबादच्या तुलनेत पैठण येथे उपलब्ध असलेल्या रो- हाऊसच्या किमती कच्चा माल, विटा, वाळू येथे कमी किमतीत मिळत असल्याने येथील फ्लॅट, रो- हाऊसच्या किमती कमी आहेत.

रो हाऊसकडे कल वाढू लागला
>पैठण शहरात दोन वर्षांपूर्वी या किमती कमी होत्या. आता त्याच्या किमती वाढल्या आहेत, तरीही पैठणमध्ये मोठ्या प्रमाणात रो हाऊस तयार होत आहेत.
- संतोष गोबरे, बिल्डर पैठण