आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सहारा सिटी’त पोलिसांना ८.५ लाखांत मिळणार प्लाॅट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अनेक वर्षांपासून केवळ कुंपण घातलेल्या अवस्थेत पडून असलेल्या बीड बायपासवरील ‘सहारा सिटी’त स्वत:चे घर होण्याचे स्वप्न शहरातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पडू लागले असून ते पूर्ण करण्यासाठी पोलिस आयुक्तालयातील मानव संसाधन शाखा कामाला लागली आहे. इथले एक हजार चौरस फुटांचे प्लाॅट ८.५ लाख रुपयांना पोलिसांना मिळवून देण्यासाठी प्रशासने कार्यवाही सुरू केली आहे.

पोलिस आयुक्तांतर्फे ३० नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले असून त्यात या योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या प्लाॅटसाठी आयुक्तालयात अर्ज करण्यासाठी िदलेली १० डिसेंबरची मुदत वाढवून देण्यात आली असून पोलिसांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. परिपत्रक जारी करण्यापूर्वी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक बैठकही घेतली होती. त्यात हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तेव्हापासूनच कर्मचारी या प्लाॅटसाठी अर्ज करीत असून पहिल्याच टप्प्यात सुमारे ११०० पोलिसांनी अर्ज केले आहेत.

‘सहारा सिटी’ च्या मूळ योजनेत फ्लॅट आणि रो हाऊसेसची योजना होती. नमुना बांधकामही तिथे करण्यात आले आहे. सिडकोने या बिगरशेती जागेवरील प्लॅन आणि ले-आऊट मान्य केलेले आहेत. त्यानुसार तिथे रस्ते, पाणी आणि सांडपाण्याची सुविधा, पथदिवे, मैदान, वाचनालय, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, सांस्कृतिक सभागृह, व्यायामशाळा, खुल्या नाट्यगृहाची योजना आधीच मंजूर झाली आहे. मात्र, सहारा उद्योग समूह आर्थिक अडचणीत आला आणि या प्रकल्पाचे काम सन २०१२ नंतर पुढे सरकलेच नाही. दरम्यानच्या काळात अनेकांनी दीड ते दाेन लाख रुपये भरून त्या प्रकल्पातील फ्लॅट आणि रो हाऊस बुक केले आहेत.

~५०
हजारांचे रेखांकित धनादेश, असे एकूण २,५०,००० रुपये.
~१०,०००
प्लाॅटच्या खरेदीखत नोंदणीसाठी संबंधित विकासकाकडे

प्राथमिक पातळीवर पाहणी सुरूु
^पोलिस कर्मचाऱ्यांचे स्वत:चे घर व्हावे यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाकडून हा पुढाकार घेतला गेला आहे. सध्या ही बाब अतिशय प्राथमिक पातळीवर असून कर्मचाऱ्यांना ही जागा पसंत पडल्यास पुढील व्यवहार होणार आहे. - अमितेशकुमार, पोलिसआयुक्त औरंगाबाद

२० टक्के रक्कम पोलिसांना उभारावी लागणार
या प्लाॅट खरेदीसाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीही आयुक्तालयाकडून हालचाली सुरू असल्याचे समोर आले आहे. प्लाॅटच्या किमतीच्या २० टक्के रक्कम संबंधित खरेदीदार पोलिसांना स्वत: उभी करावी लागणार आहे. प्लाॅटधारक पोलिसांची एक सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात येईल, असेही आयुक्तालयाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, सहारा सिटीतील फ्लॅट आणि राे हाऊससाठी सुमारे लाख रुपये (१० टक्के) अग्रिम रक्कम देणाऱ्या औरंगाबादकरांचे काय, असा प्रश्न पोलिस आयुक्तालयाकडून सुरू झालेल्या हालचालींमुळे निर्माण झाला आहे. त्या संदर्भात सहारा प्रकल्पातर्फे बोलण्यासाठी अधिकृत व्यक्ती उपलब्ध नाही. पोलिस आयुक्तालयाने काढलेले परिपत्रक इंग्रजीत भाषांतरित करून सहाराच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती तिथे असलेल्या कर्मचाऱ्याने दिली.
बातम्या आणखी आहेत...