आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील फ्लॅटचे दर वाढवण्याचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिमेंटच्या प्रत्येक गोणीमागे 70 ते 100 रुपये दरवाढ करण्यात आली आहे. यामागे सिमेंट लॉबी कार्यरत असून याच्या निषेधार्थ औरंगाबाद क्रेडाईने 15 ते 21 जुलैदरम्यान एक आठवडा सिमेंट खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरवाढ मागे न घेतल्यास फ्लॅट बांधकामाचे दर 200 रुपये प्रतिचौरस फुटांनी वाढवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

खडी, रेती, लोखंड, सिमेंट आदी बांधकाम साहित्याच्या भावात सातत्याने भाववाढ होत असल्याने मागील बर्‍याच दिवसांपासून बांधकाम क्षेत्र मंदीच्या सावटाखाली आहे. या क्षेत्रास समस्येतून बाहेर काढण्यासाठी विशेष पॅकेजची गरज आहे. काही दिवसांपूर्वी 220 रुपयांमध्ये सिमेंटची गोणी मिळत होती. सिमेंट क्षेत्रात 25 कंपन्या असून शहरात पाच महत्त्वाच्या कंपन्यांच्या सिमेंटची मोठी मागणी आहे. शहरात प्रतिदिन 50,000 सिमेंट बॅगा लागतात. मोठ्या शहरांमध्ये जमिनीचे भाव जास्त असल्याने बांधकामाचे दरही जास्त असून सदनिकांचे दर मोठ्या प्रमाणावर आहेत, परंतु लहान शहरांमध्ये विकासकांना काम करताना सिमेंट व लोखंडाच्या दरावर नफा कमवण्याची संधी असते. सिमेंट व लोखंडाच्या दरांमध्ये वाढ झाल्याने कमाईतील फरक कमी होत चालले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दर मागे घेण्यासंबंधी राष्ट्रीय व राज्यस्तरावरील क्रेडाईच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे. राज्यात अडीच हजारांवर क्रेडाईचे सदस्य आहेत. औरंगाबाद क्रेडाईच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, औरंगाबाद के्रडाईचे उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव रवी वट्टमवार, राजेंद्रसिंग जबिंदा, विकास चौधरी, नरेंद्रसिंग जबिंदा, संग्राम पटारे, सुनील बेदमुथा, नितीन बगडिया, मार्कंडेय लाटकर उपस्थित होते.