आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : संग्रामनगर उड्डाणपूलाला \'शहानूर हमवी\' यांचे नाव! कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-संग्रामनगर उड्डाणपूल वाहतुकीस खुला होण्यापूर्वीच त्यावर हजरद सय्यद शहानूर हमवी यांच्या नावाचा फलक लावल्यामुळे रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुरुवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले.

नगरसेवक मिलिंद दाभाडे, दिनकर ओंकार, के. व्ही. मोरे यांच्या नेतृत्वाखाली संग्रामनगर उड्डाणपुलावर फलक लावून उद्घाटन झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. उस्मानपुरा पोलिसांनी फलक जप्त केला. रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकार्‍यांसह शोएब अल्लाउद्दीन, शेख रहीम, शेख वाजेद यांच्यावर गुन्हे दाखल झाले. दरम्यान, या पुलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, या मागणीचे पत्र शुक्रवारी महापौरांना देण्यात येईल, असे शिवसेनेचे पश्चिम शहरप्रमुख राजू वैद्य यांनी सांगितले.

नावासाठी उपोषण

पुलाला शहानूर हमवी यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी लोकविकास पार्टीतर्फे अब्दुल वाहेद यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणास एमआयएम, जनजागरण समिती, आंबेडकर नॅशनल काँग्रेस, ख्रिस्ती कृती समिती, आंबेडकर फोर्स यांनी पाठिंबा दिला.