आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमधील जलप्रकोप: प्रलयातून वाचलो, हेच नशीब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी आणि संगीता चारधाम यात्रेसाठी मंगळवारी सकाळी 10.30 वाजता औरंगाबादहून दिल्लीला गेलो. दिल्लीहून संध्याकाळी 7.30 वाजता हरिद्वारला पोहोचलो. तेथे कपूर हॉटेलमध्ये मुक्काम केला. बुधवारी हरिद्वारमध्ये
देवदर्शन घेऊन राणा चेट्टीत गेलो. यमुनोत्रीचे दर्शन घेतले. गुरुवारी सकाळपासून हलक्या सरी कोसळत होत्या.
शुक्रवारी सकाळी सात वाजता उत्तरकाशीकडे निघालो. पावसाची रिपरिप सुरूच होती. घाटातील अरुंद रस्त्याने प्रवास सुरू झाला. एक तर गाडी दरीत कोसळेल किंवा गाडीवर दरड तरी कोसळेल अशी भीती वाटत होती. शेवटी उत्तर काशीत पोहोचलो काशीश्वराचे दर्शन घेऊन येथेच मुक्काम केला. त्या रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बघता बघता मृत्यूचे तांडव सुरू झाले. होत्याचे नव्हते होत असताना आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत होतो. शनिवारी पहाटे 5.30 वाजता गंगोत्रीला निघालो. मात्र, अर्ध्या रस्त्यातच गंगा नदीवरील पूल कोसळला होता. जागोजाग दरडी कोसळलेल्या होत्या, अनेक ठिकाणी मार्ग बंद होते. अशा परिस्थितीत गुरुवारी सकाळी दिल्लीत पोहोचेपर्यंत अनेक संकटांवर मात करावी लागली. या काळात अक्षरश: उपाशीपोटी राहावे लागले. मात्र, शेवटी कशीबशी आमची सुटका झाली.

5 किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प होती. दोन तासांनी गाडी वळवून परत निघालो. या प्रवासात आमच्या जवळ केवळ पाण्याची बाटली होती, तिही 30 रुपयांत घ्यावी लागली. संध्याकाळी परत येताना गाडीतील डिझेल संपत आले. उत्तर काशीत डिझेलसाठी अडीच तास थांबावे लागले.

संध्याकाळी हॉटेलात जेवण केले आणि थांबलो. रविवारी पहाटेपासून पाऊस सुरू होता. अशा परिस्थितीत गुप्त काशीला जाण्यासाठी निघालो. 65 किमीपर्यंत गेल्यावर दरड कोसळल्याने तेथे दोन्ही बाजूचे रस्ते बंद होते. आमच्यासोबत 50 यात्रेकरू होते. दोन तासांनंतर जवळच्या लमगावात मुक्काम केला. दिवसभर उपासपोटी प्रवास केला होता. रात्री गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने मोबाइल बॅटरी चार्ज करता आली नाही. गावातील एका छोट्या हॉटेलमध्ये भोजन व निवासाची सोय करून घेतली. सोमवारी सकाळी पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला. गावापासून 25 किलोमीटर अंतरावर रस्ता उखडला होता. दरड कोसळून रस्त्याच्या मधोमध मोठा दगड गतिरोधक बनला होता. पुन्हा त्या गावात येऊन सरपंचाशी संपर्क साधून सहकार्य मागितले. त्यांनी कोणतीच मदत केली नाही.उपाशीच झोपावे लागले. मंगळवारी सकाळी रस्त्यावरील दगडाजवळ सर्वच जण जमलो. दगड हलवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ!. दुस-या गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने दगड हलवण्यास यशस्वी झालो. पुन्हा प्रवास सुरू झाला. नवी टेहरी या गावात पोहोचलो. पुढेही रस्ता खचल्याचे कळाले. टेहरीत उपाशी झोपलो. बुधवारी चालकाने दूरध्वनीवरून पर्याय शोधला. प्रतापगडमार्गे निघालो आणि ऋषिकेशमध्ये दाखल झालो. त्या रात्री हरिद्वारमध्ये दर्शन घेऊन मुक्काम केला. गुरुवारी सकाळी दिल्लीकडे रेल्वेगाडीने निघालो. दिल्लीला सकाळी 11.30 वाजता पोहोचले. तेथून संध्याकाळी साडेपाच वाजता स्पाइस जेटच्या विमानात बसून रात्री साडेसात वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहोचलो.

कोणाचीच मदत मिळाली नाही
आम्ही जेव्हा संकटात होतो तेव्हा मोबाइल बंद असल्याने कोणाचीच मदत मिळाली नाही. आम्हीच संकटांवर मात करत गेलो. मात्र, औरंगाबादेतून सतीश वैद्य आणि राजू वैद्य नेहमी संपर्कात होते.
5 किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प होती. दोन तासांनी गाडी वळवून परत निघालो. या प्रवासात आमच्या जवळ केवळ पाण्याची बाटली होती, तिही 30 रुपयांत घ्यावी लागली. संध्याकाळी परत येताना गाडीतील डिझेल संपत आले. उत्तर काशीत डिझेलसाठी अडीच तास थांबावे लागले.

संध्याकाळी हॉटेलात जेवण केले आणि थांबलो. रविवारी पहाटेपासून पाऊस सुरू होता. अशा परिस्थितीत गुप्त काशीला जाण्यासाठी निघालो. 65 किमीपर्यंत गेल्यावर दरड कोसळल्याने तेथे दोन्ही बाजूचे रस्ते बंद होते. आमच्यासोबत 50 यात्रेकरू होते. दोन तासांनंतर जवळच्या लमगावात मुक्काम केला. दिवसभर उपासपोटी प्रवास केला होता. रात्री गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याने मोबाइल बॅटरी चार्ज करता आली नाही. गावातील एका छोट्या हॉटेलमध्ये भोजन व निवासाची सोय करून घेतली. सोमवारी सकाळी पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला. गावापासून 25 किलोमीटर अंतरावर रस्ता उखडला होता. दरड कोसळून रस्त्याच्या मधोमध मोठा दगड गतिरोधक बनला होता. पुन्हा त्या गावात येऊन सरपंचाशी संपर्क साधून सहकार्य मागितले. त्यांनी कोणतीच मदत केली नाही.उपाशीच झोपावे लागले. मंगळवारी सकाळी रस्त्यावरील दगडाजवळ सर्वच जण जमलो. दगड हलवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ!. दुस-या गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने दगड हलवण्यास यशस्वी झालो. पुन्हा प्रवास सुरू झाला. नवी टेहरी या गावात पोहोचलो. पुढेही रस्ता खचल्याचे कळाले. टेहरीत उपाशी झोपलो. बुधवारी चालकाने दूरध्वनीवरून पर्याय शोधला. प्रतापगडमार्गे निघालो आणि ऋषिकेशमध्ये दाखल झालो. त्या रात्री हरिद्वारमध्ये दर्शन घेऊन मुक्काम केला. गुरुवारी सकाळी दिल्लीकडे रेल्वेगाडीने निघालो. दिल्लीला सकाळी 11.30 वाजता पोहोचले. तेथून संध्याकाळी साडेपाच वाजता स्पाइस जेटच्या विमानात बसून रात्री साडेसात वाजता औरंगाबाद विमानतळावर पोहोचलो.
कोणाचीच मदत मिळाली नाही : आम्ही जेव्हा संकटात होतो तेव्हा मोबाइल बंद असल्याने मदत मिळाली नाही. आम्हीच संकटांवर मात करत गेलो. शब्दांकन : हरेंद्र केंदाळे