आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवामान बदलामुळे साथरोगाची लागण, नागरिकांचे आरोग्य संकटात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - हवामानबदलामुळे फुलंब्री तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना सर्दी, मलेरिया, टायफाइड आणि डोकेदुखी यासारख्या आजारांनी त्रस्त केले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी फुलंब्री शहर - परिसरात जोरदार पाऊस झाला नदीनाल्यांना पूर आला. त्यानंतरच्या संततधार सुरूच राहिल्याने साथीरोगाला आमंत्रण मिळाले. सध्या अनेक नागरिकांना सर्दी, खोकल्याची लागण झाली आहे. तर काहींना मलेरिया आणि टायफाइड डोकेदुखीच्या आजारांना बळी पडावे लागत आहे.

तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने पावसाळ्यात साथरोग पसरू नये म्हणून महत्त्वपूर्ण सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. वेळोवेळी पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची अंमलबजावणी झाल्याने साथरोग पसरत आहे. सध्या फुलंब्री येथील जवळपास सर्वच खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. गणोरी, जातेगाव, आळंद, बाबरा वडोदबाजार तसेच आरोग्य उपकेंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात येत असून ही यंत्रणा अधिक गतिमान करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. सध्या तालुक्यातील पाचही आरोग्य केंद्रांत दररोज सरासरी ७० ते ८० रुग्ण येत आहेत.

प्रत्येक शनिवारी कोरडा दिवस पाळण्यात येतो. या दरम्यान, घरात साठवण्यात आलेले पाणी सांडून सर्व भांडी कोरडी ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडून नागरिकांच्या आरोग्याबाबत काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य िवभागाने िदला आहे.

खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी
माझ्याकडे सर्दी, ताप, डोकेदुखी आणि टायफाइडसारख्या आजारांचे जवळपास ४० ते ५० रुग्ण येतात. त्यामुळे दररोज शहरात असलेल्या खासगी रुग्णालयांत ४०० ते ५०० रुग्ण येत असावेत, असा अंदाज आहे. डॉ.मनोज गाडेकर