आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चारा छावण्यांसाठी मिळाले १४३ कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाड्यातीलतीन जिल्ह्यांत चारा छावण्या उभारण्यासाठी १४३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी आवश्यक तो सर्व निधी देण्याची घोषणा केली होती, त्यानुसार प्रशासनाकडे हा निधी प्राप्त झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच मराठवाड्याचा दुष्काळी दौरा केला होता. या वेळी त्यांनी चारा छावण्यांना भेटी दिल्या होत्या. छावण्यांसाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मराठवाड्यात आतापर्यंत ३३ चारा छावण्यांना मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात तर फक्त एक चारा छावणी सुरू आहे. आता १४३ कोटी रुपयांचा निधी मिळाल्यामुळे चारा छावण्यांची संख्या वाढवता येऊ शकेल.

बिलेआठवडाभरात मिळणार: मराठवाड्यातया वर्षी दुष्काळी परिस्थिती असूनही चारा छावण्यांची संख्या मात्र फारशी दिसली नाही. चारा छावणीसाठी काढण्यात येणाऱ्या बिलांसाठी महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. त्यामुळे फारसे लोक पुढे येत नाहीत. मात्र, आता ही बिले आठ ते दहा दिवसांत देण्यात येणार आहेत. तसेच निधी नाही अशी समस्या निर्माण होणार नाही, अशी माहिती दांगट यांनी दिली. प्रशासनाकडे सध्या ५३ जणांचे प्रस्ताव चारा छावण्यांसाठी आले आहेत.