आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटदाराला गंडवणारा भामटा दिल्लीत जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील कंत्राटदाराला लाख ९० हजारांचा गंडा घालणाऱ्या भामट्याला सायबरसेलच्या पथकाने सोमवारी दिल्ली येथून अटक केली आहे. कंत्राटदाराकडून लुबाडलेली संपूर्ण रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. दीपक महेश चंद (२३ रा. फरीदाबाद दिल्ली) असे या भामट्याचे नाव आहे.
भानुदासनगर येथील मनोज प्रेमसिंग चव्हाण यांना भामट्याने तुमचा मोबाइल नंबर लकी ड्रामध्ये निवडला गेला असून तुम्हाला ह्युंदाई आय २० कार देऊ, अशी बतावणी केली. चव्हाण यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांना एक आयफोन आणि काही वस्तूही पाठवल्या. त्यानंतर टॅक्स, इव्हेंट पेमेंट, आरटीओ टॅक्स या नावाखाली चव्हाण यांच्याकडून लाख ९० हजार रुपये उकळले. दरम्यान, चव्हाण यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार ऑक्टोबर रोजी जवाहरनगर पोलिस ठाण्यात केली. ‘डीलऑन डोअर’ नावाने थाटले कार्यालय : नवीदिल्लीतील संतनगर भागातील एका इमारतीच्या तळघरात या भामट्यांनी “डील ऑन डोअर’ नावाने कार्यालय थाटले आहे. दीपक चंद हा याच कार्यालयात काम करतो. त्याने चव्हाण यांच्याशी संपर्क साधून गंडा घातल्याचे मान्य केले. आरोपी दीपक हा मूळचा पंजाबमधील असून तो दिल्लीत काकाकडे राहत होता. तो काम करीत असलेली कंपनी मूळची कानपूरची असल्याची तपासात पुढे आले आहे. आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सी.डी. शेवगण, खुशालचंद बाहेती, निरीक्षक मधुकर सावंत, मनीष कल्याणकर यांनी तपास पथकाला मार्गदर्शन केले.

असा काढला माग
उपलब्ध मोबाइल नंबर आणि संकेतस्थळाच्या आधारे सायबर सेलचे कर्मचारी नितीन देशमुख यांनी ही टोळी दिल्लीत असल्याचा माग काढला. पोलिस उपनिरीक्षक हेमंत तोडकर, देशमुख, नाईक खरे, हवालदार ठाकूर जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दिल्ली गाठून भामट्याला गजाआड केले.
बातम्या आणखी आहेत...