आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादला एक्झिबिशन सेंटर देतो, २०० प्रदर्शनांचे बुकिंग आणा : मुख्यमंत्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबादेत कायमस्वरूपी एक्झिबिशन सेंटर देतो, पण त्यासाठी २०० ते २५० प्रदर्शनांचे बुकिंग आणा, अशी अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातली. ऑटो क्लस्टरच्या मंजुरीबाबत मंत्र्यांना विशेषाधिकार देऊ, अशी घोषणाही त्यांनी गुरुवारी ‘अॅडव्हांटेज महाराष्ट्र’ या उद्योग प्रदर्शनाच्या उद‌्घाटनप्रसंगी केली.
 
चिकलठाण्यात महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने बांधलेल्या कलाग्राम या वास्तूचा नीट उपयोग होत नाही.  ही जागा जर उद्योजकांना एक्झिबिशन सेंटरसाठी दिली तर उपयोग होईल, अशी मागणी आमदार अतुल सावे यांनी  प्रदर्शनाच्या उद‌्घाटनापूर्वी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. हाच धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, औरंगाबादसाठी राज्य सरकार कायमस्वरूपी एक्झिबिशन सेंटर देईल, पण त्यासाठी ७५ संस्थांचे २०० ते २५०  प्रदर्शनांचे बुकिंग आणावे लागेल.  नाहीतर तो खर्च शासनाला परवडणार नाही. उद्योग प्रदर्शनांची मोठी संख्या एक्झिबिशन सेंटरसाठी लागते. तेव्हाच  बांधकामाचा खर्च परवडतो नाहीतर या एक्स्पोसारखी तात्पुरती जागा तयार करणे सोपे जाते, असे ते म्हणाले.

क्लस्टर मंजुरीचे मंत्र्यांना अधिकार
मराठवाडा ऑटो हब म्हणून प्रसिद्ध आहेच. या ठिकाणी छोटे छोटे ऑटो क्लस्टर झाले पाहिजेत.  पण क्लस्टरला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया क्लिष्ट आहे.  त्यामुळे याच्या मंजुरीचे अधिकार मंत्र्यांना देण्याचा विचार असल्याचे फडणवीस म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...