आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा सदस्यांसाठी आज ‘व-हाड निघालंय लंडनला’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘दिव्य मराठी’ मधुरिमा क्लबच्या सदस्यांसाठी शनिवारी (चार जानेवारी) ‘व-हाड निघालंय लंडनला’ या धमाल एकपात्री नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. प्रा. डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांनी व-हाडचे विक्रमी प्रयोग केले. त्याची गिनीज बुकमध्येही नोंद झाली. व-हाडकारांनी अभिनय आणि आवाजातून निर्माण केलेल्या सर्व व्यक्तिरेखा प्रख्यात अभिनेते संदीप पाठक यांनी जिवंत केल्या आहेत. सायंकाळी चार वाजता तापडिया नाट्यगृह येथे होणा-या या हास्यकल्लोळमय प्रयोगात या व्यक्तिरेखा रसिकांना अनुभवता येणार आहेत. प्रयोगात प्रवेशासाठी मधुरिमा क्लबचे ओळखपत्र आवश्यक असून प्रथम येणा-यास प्राधान्य दिले जाणार आहे. कार्यक्रमाच्या 20 मिनिटे आधी आसनस्थ व्हावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.