आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिपदासाठी खडसेंना शुभेच्छा, पण कोर्टाचे झेंगट आहेच ना! गिरीश महाजन यांना गुदगुल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळावे यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा, पण काय करणार, त्यांच्या मागे कोर्टाचे झेंगट लागले आहे ना. लवकरच दुसरी चार्जशीट दाखल होईल, त्यात तुम्हा सगळ्यांना अपेक्षित आणखी काही नावे येतील, त्यानंतर बघा’ अशा शब्दांत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या अंतर्मनातील भावना व्यक्त केल्या.

खडसे-महाजन यांचे ‘राजकीय सख्य’ जगजाहीर आहे. गुरुवारी औरंगाबादेत आले असता तुमच्या जिल्ह्यातील सहकारी खडसे पुन्हा मंत्री व्हावेत यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर ‘माझ्या शुभेच्छा’ अशी सुरुवात करत ‘अतिरिक्त दोषारोपपत्र दाखल होणार. त्यात तुम्हाला अपेक्षित असलेली नावे असणार’ हे मुद्दाम सांगण्यास ते विसरले नाहीत. त्यामुळे ते खडसे यांना शुभेच्छा देताहेत की त्यांना गुदगुल्या होताहेत, असाच प्रश्न उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला. पत्रकारांनी त्यांना आणखी छेडण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘चांगला पाऊस होत आहे, आणखी पाऊस व्हावा’ असे म्हणत त्यांनी पत्रपरिषद आटोपती घेतली. आरोपपत्रात कोणाची नावे, असतील हेही त्यांनी सांगितले नाही, म्हणाले, ‘तुम्हाला सर्व माहिती आहे’.
पुढे वाचा..
‘लेवा पाटील’ म्हणून खडसे एकटे?
बातम्या आणखी आहेत...