आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • For Months LBT Audit Completing By Aurangabad Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलबीटीचे चार महिन्यांचे ऑडिट महानगरपालिका करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मागील चार महिन्यांत एलबीटीचे उत्पन्न घसरले असून त्याची ऑडिट करणार असल्याची घोषणा स्थायी समितीचे सभापती नारायण कुचे यांनी केली आहे. एलबीटीबाबत आचारसंहिता संपल्यानंतर स्थायी समितीत चर्चा घडवून आणणार असून उत्पन्न कमी होण्याला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले.

गतवर्षीच्या तुलनेत एलबीटीचे उत्पन्न गेल्या चार महिन्यांत वाढल्याचा दावा मनपा प्रशासन करीत असले तरी उत्पन्न कमीच असून त्याचा फटका मनपाला बसला आहे. पगाराची ओरड होणे, विकासकामांना पैसा नसणे या अडचणींचा सामना करावा लागतो. ‘दिव्य मराठी’ने एलबीटीच्या या घसरत्या उत्पन्नाबाबत 30 जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर लगेचच एलबीटीच्या फटक्यामुळे मनपाच्या कर्मचार्‍यांच्या पगाराला विलंब झाला. हा प्रश्न बिकट होत असल्याचे दिसताच आज सभापतींनी उपायुक्त सुरेश पेडगावकर, लेखाधिकारी अशोक थोरात यांच्याशी चर्चा केली. पेडगावकर म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत एप्रिल, मे, जून आणि जुलै या महिन्यांत एलबीटीची वसुली एक ते सव्वा कोटी रुपयांनी वाढली आहे. एलबीटीचे उत्पन्न कमी झाले नसल्याचा दावा त्यांनी केला.

कुचे म्हणाले, उपायुक्त पेडगावकर नवीन आहेत, ते कमी पडले असावेत; पण एलबीटी विभागात चांगल्या अधिकार्‍यांची गरज आहे, असेही ते म्हणाले. ज्या कारणांमुळे एलबीटीचे उत्पन्न कमी झाले त्यांचा शोध घेऊन दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणीही कुचे यांनी केली.


उत्पन्नावरच गणित
जून आणि जुलै महिन्यात एलबीटीचे उत्पन्न का कमी झाले याचा शोध घेण्याची गरज आहे. या उत्पन्नावरच मनपाचे गणित अवलंबून असून त्याचा फटका सर्वांना बसत आहे. नारायण कुचे, स्थायी समिती सभापती.