आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईसाठी जेटचे नवीन विमान लवकरच सेवेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याने जेटने आणखी एक विमान सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. औरंगाबाद-मुंबई सेवेसाठी जेटच्या वरिष्ठ कार्यालयाकडून विचारणा केल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली. मात्र, जेटच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. शक्यतो दिवाळीनंतर ही सेवा सुरू होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

औरंगाबादेतून मुंबईसाठी जेट एअरवेज आणि एअर इंडियाकडून फ्लाइट सुरू आहेत. जेटच्या विमानांना प्रवाशांकडून प्रतिसाद वाढल्यामुळे जेट एअरवेजने एटीआर विमानऐवजी मोठ्या विमानांचा वापर सुरू केला आहे. सध्या जेटकडून सकाळी आणि सायंकाळी अशा दोन विमानांची सेवा देण्यात येते. मात्र, प्रवाशांची संख्या बघता आणखी एका विमानाची सेवा सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, इंडिगोकडूनही येत्या आॅक्टोबरपासून मुंबईसाठी विमान सेवा सुरू होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...