आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ कोटींसाठी युटिलिटी कंपनीने बंद केली कामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘समांतर’चा ठेका घेतलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने मनपाकडून नऊ कोटी रुपये मिळवण्यासाठी शहराच्या विविध भागांत जलवाहिनी टाकण्याची कामे बंद केली. शनिवारी (१८ जून) झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी याविषयी तक्रार केली. त्यामुळे मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सायंकाळी चार कोटी रुपये देऊन पुढील तीन-चार दिवसांत कामे मार्गी लावण्याची सूचना कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली.

महापालिकेची शनिवारी सर्वसाधारण सभा झाली. त्यात नगरसेवकांनी कंपनीच्या कारभारावर हल्लाबोल केला. कंपनीचे कार्यालय बंद असल्याने नागरिकांनी तक्रारी कुठे कराव्यात, असा प्रश्न उपस्थित केला. शहरात काही ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होते. ते अचानक बंद झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यावर शहर अभियंता सखाराम पानझडे म्हणाले की, पाइप, इतर साहित्याचा मोबदला कंपनीने दिला नाही. त्यामुळे ही कामे थांबली आहेत. ही रक्कम मनपाकडून कंपनीला दिली जाईल. त्यामुळे कामे सुरू होऊ शकतील. या उत्तरावर नगरसेवकांचे समाधान झाले नाही. आम्ही नागरिकांना काय सांगावे, त्याचा प्रशासनाने खुलासा करावा, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे आयुक्तांनी हस्तक्षेप करत सांगितले की, कंपनीला दरमहाच्या कामापोटी नऊ कोटी रुपये देण्याची जबाबदारी महापालिकेची होती. ती रक्कम दिल्याने कंपनी पुरवठादारांना पैसे देऊ शकली नाही. आयुक्तांच्या वक्तव्यानंतर या विषयावरील चर्चा थांबली.
टाळेउघडण्यासाठी मध्यस्थी : दरम्यान,सायंकाळी बकोरियांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी टाळे ठोकल्याचे तसेच नऊ कोटी रुपये मनपाकडे थकल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात चार कोटी घ्या, असे सांगत टाळे उघडण्यासाठी मध्यस्थी करण्याचे आश्वासन दिले.

आदित्य यांच्या उपस्थितीत बैठक : समांतर जलवाहिनीचा ठेका औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीकडे ठेवायचा की नाही, यावरून शिवसेनेत पालकमंत्री रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात वाद आहे. आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कोर्टात हा वाद पोहोचला असून त्यांंच्या उपस्थितीत सकाळी ११.३०च्या सुमारास महापौर बंगल्यावर बैठक होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांविषयी सरकार किंवा महापालिकेशी संबंधित व्यक्तीच बैठक घेऊ शकते. त्यामुळे ही बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

महापालिकाही करू शकेल 'समांतर'चे काम
कंपनीचाठेका कायम ठेवायचा की रद्द करायचा याविषयी गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू आहे. न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत. शासनाने संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कंपनीला २६ कलमी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. विद्यमान आयुक्त बकोरिया ठोस निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत, अशीही चर्चा मनपा वर्तुळात आहे. या संदर्भात बकोरियांना विचारणा केली असता ते म्हणाले की, निर्णय घेण्यासाठी कंपनीला आठ दिवसांची डेडलाइन दिली आहे. अर्थात चार-पाच दिवसांत होणाऱ्या सर्वसाधारण सभेत चर्चा होईल. त्याच वेळी मी माझे मत मांडणार आहे. मात्र, शासनाकडून निधी मिळणार असल्याने "समांतर'चे काम महापालिकाही करू शकते.
महापालिकाही करू शकेल 'समांतर'चे काम
> नंदकुमार घोडेले
नक्षत्रवाडी वॉर्डातील जलवाहिनीची दोन कामे बंद आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळत नाही.
> गोकुळसिंग मलके
नारेगाव वॉर्डात तीन गल्ल्यांना १० दिवसांपासून पाणी आलेले नाही. तक्रारी करण्यासाठी कुणाकडे जावे?
> राजू वैद्य
एन-१ मधील गल्लीत आठवडाभरापूर्वी ३०० मीटर लांबीची नवीन पाइपलाइन टाकली. मात्र खोदकाम बुजवणे नळजोडणी थांबली आहे.