आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाखासाठी गर्भपात, विवाहितेची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माहेरहून एक लाख रुपये आणले नाहीत म्हणून सासरच्यांनी २० वर्षीय विवाहितेला बळजबरीने औषधी गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला. नंतर विषही पाजले. या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिसारवाडी परिसरातील रहिवासी तातेराव शंकर खेत्रे (५०) यांची मुलगी पूजा (२०) हिचा विवाह भोकरदन तालुक्यातील देऊळगाव कमान येथील अमित साळवेशी १५ जानेवारी २०१६ रोजी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी तिला माहेरहून एक लाख रुपये आणण्याचा तगादा सुरू झाला. पूजा पैसे आणत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पती अमित साळवे, कडूबाई रंगनाथ साळवे, कौसाबाई साळवे, अक्षय, अजय साळवे (रा. देऊळगाव कमान, ता. भोकरदन , जि. जालना) यांनी तिला वेळोवेळी शिवीगाळ करून मारहाण केली. बळजबरीने औषधी गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केला. काही दिवसांनी पती आणि त्याच्या नातेवाइकांनी पूजाला विष पाजले. या सततच्या त्रासाला कंटाळून पूजाने आत्महत्या केली. पूजाचे वडील तातेराव शंकर खेत्रे (५०, रा. मिसारवाडी) यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...