आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : उद्योजक रामेश्वर दरक यांचा खून केवळ वीस रुपयांसाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - तीस रुपये तासाप्रमाणे काम करणाऱ्या कामगाराने वाढीव २० रुपये मालकाकडे मागितले. ते देण्यास मालकाने नकार दिला, कामगारास शिवीगाळ केली. राग अनावर झालेल्या २२ वर्षीय कामगाराने या क्षुल्लक कारणावरून दारूच्या नशेत लगतचे लोखंडी फावडे मालकाच्या डोक्यात मारून मालकाचा खून करत कंपनीतून पळ काढला. मित्राच्या सल्ल्यावरून सदर खून आपण केलेला नसून सोबतच्या सहकारी कामगाराने केला. तो खून होताना मी पाहिला आहे.असा बनाव करत तो न्यायनगर मुंबई पोलिसांना शरण आला. मात्र,पोलिसांच्या चौकस नजरेतून प्रश्नांच्या भडीमारासमोर त्याचा बनाव टिकू शकल्याने माफीचा साक्षीदार म्हणून गेलेला आरोपी गणेश रघुनाथ येवले (रा.हदगाव ता.नांदेड) हल्लीमुक्काम कानडे गल्ली,पंढरपूर हा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला मुंबई पोलिसांकडून वाळूज एमआयडीसी येथे घेऊन येत त्याला सोमवारी अटक करत न्यायालयात हजर केले. त्याला १४ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती पोलिस निरीक्षक थोरात यांनी दिली.

कामावर‘तीन’ कामगार होते : वाळूज,मोरे चौक येथील डब्ल्यू ५५ सेक्टरमधील बंद पडलेल्या कंपनीत, कंपनी मालक रामेश्वर श्रीराम दरक (७२ मूळ रा.गोरेगाव मुंबई) हे महिन्यातून १०-१५ दिवसांसाठी अधूनमधून येत असत. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये बंद पडलेल्या कंपनीची देखरेख तसेच त्यांना मदतनीस म्हणून तीन तरुणांना ३० रुपये तासाप्रमाणे कामावर ठेवण्यात आले होते. इतर दोन्ही कामगार त्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात समाधानी होते.
पुढे वाचा...
> २० रुपयांसाठी केला खून
>आरोपीस कोठडी
> आरोपीचे पुणे, मुंबई पलायन
बातम्या आणखी आहेत...