आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्याच सुरक्षेसाठी हेल्मेट वापरा, अभियानात सहभागी व्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरात लवकरच हेल्मेट सक्ती लागू केली जाणार आहे. आपल्याच सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्यक असल्याने त्यासाठी जनजागृती सुरू आहे. सर्वस्तरांतून शहरवासीयांना जागृत करण्याची मोहीम, डीबी स्टारने सुरू केलेली वृत्त मालिका आणि ‘सेल्फी विथ हेल्मेट’ या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेशकुमार हेदेखील उत्साहित आहेत. त्यांनीही हेल्मेटसोबत सेल्फी काढून आपल्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे.
वाहतूक वाढली तशी अपघातांची संख्याही वाढली. त्यातून डोक्याला गंभीर दुखापती मृत्यू होण्याची संख्याही अधिक आहे. त्यामुळे औरंगाबाद पोलिसांनी लवकरच हेल्मेट सक्ती लागू करण्याची घोषणा केली आहे. याला नागरिकांबरोबरच शैक्षणिक संस्थांनी प्रतिसाद देत आतापासूनच हेल्मेट सक्ती लागू केली. मात्र, याकडे कायदा सक्ती म्हणून बघता स्वसुरक्षेसाठी स्वयंशिस्त म्हणून बघण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
आपणही काढा सेल्फी
(फक्तयुवक, युवती, महिलांसाठी)
याअभियानात सहभागी होण्यासाठी आपणही हेल्मेट घेतला असेल, तर पटकन त्यासोबत सेल्फी काढा आणि आम्हाला पाठवा.
१)हेल्मेटसोबतसेल्फी किंवा सेल्फी काढतानाचा फोटो घ्या...
२)९०४९०६७८८८या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा किंवा db.star@dbcorp.in या ई-मेलवर पाठवा. (ई-मेलवरील सेल्फीला प्राधान्य.)
३)सोबतवाहतूक सुरक्षेबाबतचा आपला संदेश जरूर पाठवा.
४)#SelfiWithHelmetलिहून पाठवलेला सेल्फी तुमच्या फेसबुक वॉलवर पोस्ट करणे आवश्यक. यातील निवडक सेल्फीला डीबी स्टारमध्ये प्रसिद्धी दिली जाईल.
बातम्या आणखी आहेत...