आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Strong Shiv Sena Big Leaders Remove Chandrakant Khaire

सेनेच्या मजबुतीसाठी ‘दादा’ सेना संपवणार, अंबादास दानवेंची उचलबांगडी करणार - खैरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा- देवळाई वॉर्ड निवडणुकीतील पराभवाचे खापर खासदार चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, मनपा सभागृह नेता राजेंद्र जंजाळ यांच्यावर फोडले. जिल्ह्यात शिवसेनेची पकड कमी होत चालली आहे. त्यामुळे शिवसेना मजबूत करण्यासाठी दादा सेना संपवणार असल्याचे सांगत येत्या जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी दानवेंची उचलबांगडी करणार असल्याचे ते म्हणाले. दानवे, जंजाळांवर टीकास्त्र सोडून खैरे यांनी पालकमंत्र्यांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला.

दानवे यांना त्यांचे समर्थक दादा संबोधतात. तो संदर्भ पकडत बुधवारी (२० एप्रिल) जिल्हा दक्षता नियंत्रण समितीनंतर पत्रकारांशी बोलताना खैरे म्हणाले की, सातारा-देवळाईत आमचे नियोजन चुकले. अतिआत्मविश्वास नडला. इतकी वर्षे खासदार राहूनही माझे पाय जमिनीवर आहेत. मात्र, आमच्या लोकांना प्रत्यक्षात स्थिती काय आहे हे समजत नाही. मित्रपक्ष भाजपच्या जागा वाढत असताना आमचा पराभव मी स्वीकारणार नाही. गेल्यावर्षी मनपा निवडणुकीतही कमी जागा मिळाल्या. मात्र, महापौर सेनेचा झाल्यामुळे मी शांत राहिलो. आता शांत राहणार नाही. लवकरच जिल्हा परिषद निवडणूक आहे. त्यामुळे सेना मजबुतीसाठी संघटनेत बदल करावेत. जिल्हाप्रमुखांची उचलबांगडी करून शहराध्यक्षांच्या रचनेत बदल झालेच पाहिजेत, असे उपनेता या नात्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना कळवणार आहे.

पुढे वाचा, संघाची शाखा बंद केल्याचा फटका,तर जंजाळचे तंगडे तोडेल, खैरेंच्या मताचा आदर