आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीढियां उन्हें मुबारक... जिन्हें छत तक हो जाना... मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता मुझे खुद है बनाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
82.8% रोहिणी मैंदे - Divya Marathi
82.8% रोहिणी मैंदे
औरंगाबाद - कितीही संकटे आली तरी त्यावर मात करत ध्येय गाठायचेच, अशा धडपडीतून काही विद्यार्थी वर्षभर प्रचंड मेहनत करतात. अभ्यासातील कठीण प्रश्नांची उत्तरे शोधतानाच त्यांना जगण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. पुस्तके मिळवताना होणारी मारामार.... फीचे पैसे जमवताना होणारी धावाधाव....अशी अडथळ्यांची शर्यत पार करत ही मुले यशोशिखर गाठतात. त्यासाठी प्रत्येक समस्या स्वत: सोडवण्याची त्यांची तयारी असते. अडचणींसमोर हार न मानता, परिस्थितीला दोष न देता तिच्याशी दोन हात करत दहावीच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या यशवंतांशी ‘दिव्य मराठी’ने साधलेला संवाद... 
 
घरोघरी भांडी घासताना निश्चित केलं डॉक्टर व्हायचं
‘आमचे शिक्षण थांबू नये यासाठी आईवडील दाेघंही दिवसभर राबतात. त्यांची धडपड पाहून मीही आईसोबत कामाला जायला सुरुवात केली. घरोघरी भांडी घासतानाच डॉक्टर व्हायचंच, असं ठरवून मन लावून अभ्यास केला. त्यातूनच हे यश मिळालं...’ हे बोल आहेत मयूरबन कॉलनीतील मनपा केंद्रीय माध्यमिक विद्यालयाच्या रोहिणी सुरेश मैंदे या विद्यार्थिनीचे. रोहिणीचे वडील सुरेश मैंदे मातीकाम करतात. रोहिणी सकाळी ७ ते १२ शाळा करून दुपारी २ ते ५ पर्यंत घरोघरी काम करायची. सायंकाळी ६ वाजता घरी आलेली रोहिणी स्वयंपाकात मदत करून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची, असे तिच्या आई सांगतात. रोहिणीला विज्ञान शाखेत पुढील शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचे आहे.
 
पुढील स्लाइडवर वाचा, 
> जिद्दीने ओलांडला समस्यांचा डोंगर
> महेंद्र मनपा शाळेतून पहिला म्हणतो, स्वप्न पूर्ण करणारच
> स्वयंअध्ययनातून मिळवले ९५ टक्के
बातम्या आणखी आहेत...