आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foreign Delagates Visited Aurangabad Zilha Parishad

औरंगाबाद जिल्हा परिषद शाळेला विदेशी पाहुण्यांची सदिच्छा भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : वजनापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला विदेशी पाहुण्यांच्या पथकाने भेट दिली. या पथकाशी चर्चा करताना सभापती संतोष पा.जाधव.
लासूर स्टेशन - गंगापूर तालुक्यातील वजनापूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला विदेशी पाहुण्यांच्या पथकाने नुकतीच भेट दिली. मुलांच्या प्रगतीबद्दल शिक्षकांनी पथकाला माहिती दिली. या वेळी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव यांनी विदेशी पाहुण्यांचे स्वागत केले. मुंबई शिक्षण उपक्रम या स्वयंसेवी संस्थेमार्फत राबवण्यात येणा-या वाचन-लेखन-गणन उपक्रमाच्या निमित्ताने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, केनिया, आफ्रिकेमधील १६ जण सध्या राज्यभरातील जिल्हा परिषद शाळांना भेटी देत आहेत. या उपक्रमानिमित्त वजनापूरच्या शाळेला विदेशी पाहुण्यांनी भेट दिली.

हसत-खेळत शिक्षणाची संकल्पना
यात अमेरिकेतील फिलव्हिप, लिन, मेक्सिकोचे सारा, लिबेया यांचा समावेश होता. या भेटीत त्यांनी उपक्रमातील क्रिया-कृतींची पाहणी केली.या वेळी विद्यार्थी गटात गणितीय क्रिया करणे, संख्या लिहिणे, संख्यावाचन यासारख्या क्रिया विद्यार्थी हसत-खेळत करण्याची संकल्पना आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील शाळांना विदेशी शिक्षणप्रेमी भेट देत आहेत. या वेळी मुख्याध्यापक संतोष आळजकर, गोपाल उंदरे, अशोककुमार बांगर, सुभाष गवई, सोमराज गिरडकर, राजेंद्र चव्हाण, दशरथ कांबळे, मनसूब चव्हाण, विठ्ठल चव्हाण, धनाजी जाधव, स्वयंसेवक अमोल चव्हाण, संतोष झिंडे, पवन चव्हाण आदींची उपस्थिती होती.