आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंच होम'च्या हॉटेल मॅनेजमेंटसाठी १४ लाखांची विदेशवारी उद्यापासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कातून होत असलेल्या विदेश वारीला ऑगस्टला प्रारंभ होत आहे. पती-पत्नीसह दहा व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या पंधरा दिवसीय युरोप दौऱ्यासाठी विद्यापीठाने 'सिप्रा' कंपनीला १४ लाखांचे 'अॅडव्हान्स' पेमेंट केले आहे. या पैशांतून सहा देशांच्या सहलीचे पॅकेज करून घेतले आहे. विशेष म्हणजे, पैसे भरून जाऊ अशी वल्गना करणाऱ्या सदस्यांनी अद्याप विद्यापीठाकडे पैसे जमा केले नसल्यामुळे आर्थिक भुर्दंड होणारच आहे.
विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना 'लंच टाईम'मध्ये जेवण करता यावे म्हणून विद्यापीठाने प्रशासकीय इमारतीसमोर 'लंच होम' उभारले आहे. या 'लंच होम'च्या अधारेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स सुरू करण्याचा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा मानस आहे. अत्यंत हास्यस्पद बाब म्हणजे, या कोर्सच्या उभारण्यासाठी युरोपच्या अभ्यास दौऱ्याचे प्रयोजन आहे. अर्थसंकल्पातील २५ लाखांच्या तरतुदीचा आधार घेत निव्वळ सहलीचे पॅकेज करून घेतले आहे. त्यासाठी विद्यापीठाने गुप्तपणे १४ लाखांचे अॅडव्हान्स पेमेंट करून महिना उलटला. विद्यार्थी संघटनांनी केलेल्या संतप्त आंदोलनानंतर डॉ. शिवाजी मदन, डॉ. दत्तात्रय आघाव यांनी स्वखर्चाने जाण्याचा पवित्रा घेतला. मात्र आता उद्या रात्री 'टेकऑफ'ची वेळ आली आहे, तरीही पैसे भरण्याचा पत्ता नाही. 'सिप्रा'ने मात्र दहा जणांचा पाच देशांचा दौरा बुक केला आहे.
पाच देशांचा दौरा करणार-
ऑगस्ट रोजी औरंगाबादेतून रवाना होतील, मुंबई येथून विमानाने इटलीच्या राजधानी रोम येथे पहिल्यांदा जातील. तेथे दोन दिवसांचा मुक्काम आहे. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, बेल्जीयम, स्वीत्झर्लँड आदी देशांची भ्रमंती करणार आहेत. त्याशिवाय व्हॅटीकन सिटी येथेही मुक्काम राहणार आहे. १४ ऑगस्ट रोजी पुन्हा औरंगाबादेत परत येणार आहेत.
अर्थसंकल्पातीलतरतुदीचा सोयीस्कर अन्वयार्थ
विद्यापीठाचा अर्थसंकल्प डॉ. शिवाजी मदन यांनी १५ मार्च रोजी सादर केला होता. "विद्यापीठ अधिकार मंडळ सदस्यांना शैक्षणिक बदलांच्या अभ्यास दौऱ्यासाठी' या शीर्षकाने २५ लाखांची तरतूद केली होती. व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद आणि अधिसभांना अधिकार मंडळे असे म्हटले जाते. येथे मात्र फक्त व्यवस्थापन परिषद सदस्यांचा दौरा काढण्यात आला आहे. शिवाय कुलगुरूंच्या जिमसह 'कटअप मोशन'ची नामुष्की टाळण्यासाठी डॉ. मदन यांनी तरतूद केली म्हणजे खर्च होतेच असे नाही. तरतूद केलेली रक्कम अखर्चित राहील असेही म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याच नेतृत्वात विदेशवारी सुरू आहे.
विद्यापीठांची नावेच माहिती नाहीत
अभ्यास दौऱ्यावर जात असलेल्या काही व्यवस्थापन परिषद सदस्यांना 'दिव्य मराठी' प्रतिनिधीने अभ्यास दौऱ्याविषयी विचारले. या सदस्यांपैकी कुणीही हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांशी संबंधित नाहीत, तरीही युरोपीय विद्यापीठांचा अभ्यास करत असल्याचे भासवण्यात आले आहे. कोणत्या युरोपीय विद्यापीठात जाणार आहात? या प्रश्नाचे एकाही सदस्याने उत्तर दिले नाही. एवढेच नव्हे, तर किमान एका विद्यापीठाचे नावही सांगू शकले नाहीत.
अवचार दांपत्याने दिले एक लाख
व्यवस्थापनपरिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी दीड लाख रूपये जमा केले आहेत. डॉ. गणेश शेटकार पत्नी अधिष्ठाता डॉ. शोभना जोशी यांच्यासह जाण्याचे नियोजित आहे. त्यांनी लाख रूपये जमा केलेले नाहीत. डॉ. स्मिता अवचार पती सुरेश अवचार यांच्यासह जाणार आहेत. त्यांनी दोघांचे तीन लाख देणे अपेक्षित असताना फक्त लाख दिले आहेत. डॉ. मेहर पाथ्रीकर यांचेही पैसे आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. गीता पाटील, डॉ. वसंत सानप यांनीही दौऱ्याची तयारी केली आहे. दोघांनी पोस्ट डेटेड चेक दिले आहेत. डॉ. शिवाजी मदन, डॉ. दत्तात्रय आघाव यांचे पैसे जमा झाल्याची माहिती आहे.