आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी पर्यटकांनी जोपासले औरंगाबादेत समाजसेवेचे व्रत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात परदेशी नागरिक पर्यटनासाठी येतात. परंतु गेल्या दोन वर्षांत ६५ हून अधिक अमेरिकी, ऑस्ट्रेलियन, जर्मन, स्लोव्हाकिया आदी देशातील नागरिकांनी औरंगाबादेत पर्यटनासोबतच समाजसेवेत हातभार लावला. जलयुक्त शिवार, इंग्रजी संभाषण वर्ग, आरोग्यविषयक चांगल्या सवयी, शारीरिक कसरती आणि इतरही अनेक क्षेत्रात शहरवासीयांना मार्गदर्शन केले. पर्यटनासोबतच सामाजिक कार्य करण्याच्या या प्रकाराला व्हॉल्यून टुरिझम म्हणजेच व्हॉल्युंटरी टुरिझम असे नाव असून गेल्या दोन वर्षांपासून दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून हा प्रकार शहरात रुजतोय.
औरंगाबाद ही राज्याची पर्यटन राजधानी. राज्यातील पर्यटन जिल्ह्याचा बहुमान मिळवणारा दुसरा जिल्हा. अजिंठा आणि वेरूळ अशी दोन जागतिक वारसास्थळे असणारा देशातील एकमेव जिल्हा. शहरात पर्यटक येतात आणि पर्यटनाचा आनंद घेऊन निघून जातात. परंतु किरॉन वैष्णव यांच्या दिशा म्हणजेच डेव्हलपिंग इंटिग्रेटेड सोल्युशन्स फॉर ह्युमेनिटेरिअन्स अॅडव्हान्समेंट या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून परदेशी पर्यटक भारतात समाजसेवा करतात. गेल्या दोन वर्षांत अशा पद्धतीने फ्रान्स, न्यूझीलंड, अमेरिका, इंग्लंड, स्पेन, श्रीलंका, जर्मनी, अर्जेंटिना, स्वीडन, हंगेरी, इटाली, इस्टोनिया, झेक रिपब्लिक, पोलंड, कॅनडा, थायलंड आणि चीनमधून ७५ हून अधिक पर्यटक-स्वयंसेवक औरंगाबादेत येऊन गेले आहेत.

भारतीयसंस्कृतीचा अभ्यास : पर्यटकांनायेथे भारतीय संस्कृतीतील बारकावे समजण्याची संधी मिळते. २५ ते ३० जणांनी योगाचे प्रशिक्षण घेऊन आपल्या देशात योग शिक्षक म्हणून कार्य सुरू केले आहे. साऊथ कोरियाचे ब्लॅक ब्लुचर आणि तमेरा ब्लुचर यांनी १५ दिवस खेडेगावात राहून शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा प्रसार केला. रशियन प्राध्यापिका व्हिक्टोरिया डोमोनिव्ह आणि व्हिक्टर डोमोनिव्ह, टाटियाना पेकोलाेव्हा यांनी वारसा स्थळांचे संवर्धन करण्याच्या कार्यक्रमात हातभार लावला. फ्रेंच संशोधक डाॅ.जोएल गिहाबुडो आणि डाॅ. मायीआ आेरासी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी काम केले. व्हिलसंेट फ्लोरेन्स, मारगेक्स आणि मार्टीन गेहार्ड यांनी विजयादशमीच्या कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून काम केले. पोलंडच्या जोआना स्टेकॉविच यांनी एचआर आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन केले.

पर्यटनाला चालना
व्हॉल्यून टुरिझमहा पाश्चात्त्य देशात लोकप्रिय प्रकार आहे. आपल्याकडे हा हळूहळू हा प्रकार नावारूपाला येत आहे. शहरात स्वयंसेवक म्हणून येण्यासाठी आमच्याकडे आजघडीला २० ते २५ पर्यटकांचे अर्ज पेंडिंग आहेत. ही मंडळी येथे पर्यटन करतात. त्यांच्या देशात आपल्याकडील पर्यटन स्थळांची प्रसिद्धी करतात. यामुळे आपोआपच पर्यटनाला चालना मिळते. किरॉन वैष्णव, संचालक,दिशा इंटरनॅशनल फाउंडेशन ट्रस्ट

असे चालते काम
वैष्णव हे मूळ नांदेडचे. काही काळ त्यांनी औरंगाबादेत काम केले. नंतर उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी न्यूझीलंड गाठले. वर्षे तेथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण आणि नोकरी केली. या काळात अनेक परदेशी नागरिकांची ओळख झाली. यामुळेच ३५ देशांत त्यांचे नेटवर्क तयार झाले. किरॉन दिशाच्या वेबसाइटवर हे पर्यटक मागणी टाकतात. यातून निवडक पर्यटकांना ते शहरात बाेलावतात. या वेळी त्यांचा निवास किरॉन यांच्या घरीच असतो.