आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉल ट्युबर तंत्रज्ञानाने वाढताहेत रोपे, वन विभागाने हिमायतबागेतील रोपवाटिकेत उभारले नेटशेड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेले तीन वर्षे दुष्काळाशी सामना केल्यानंतर मागच्या वर्षीप्रमाणेच यंदा पावसाळ्यात पन्नास लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट विभागीय आयुक्तांनी दिले आहे. त्यासाठी वनविभाग कामाला लागला असून एप्रिल महिन्यात एकट्या हिमायत बागेत अडीच लाख रोपट्यांची लागवड झाली असून पॉल ट्युबर तंत्रज्ञानाने ते वाढवले जात आहेत.
हिमायत बागेच्यामागे महापालिकेची जागा आहे.
 
ही जागा मनपाने वन विभागाला काही काळासाठी रोपवाटिकेकरिता दिली आहे. या आठ एकर जागेत अडीच लाख रोपटी लावण्यात आली आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एम.देशमुख यांनी अठरा प्रकारची रोपे तयार केली आहे. यात कडूनिंब, जांभूळ, शिकेकाई, लिंबू, शिसम, साग, सिताफळ, लालचंदर, बोगनवेल, आंबा, चिकू अादींची रोपटी आहेत.
 
पॉलट्युबर तंत्रज्ञानाने लागवड : वनविभागाचेअधिकारी देशमुख यांनी जुलै २०१६ पासून ही लागवड सुरू केली. तेथे हिरव्या रंगाच्या नेट नेटशेडखाली रोपटी उभी आहेत. त्यांना सकाळी सायंकाळी पाणी दिले जात आहे. ही रोपटी पॉल ट्युबर तंत्रज्ञानाने एका लोखंडी ट्रेवर लावली आहेत. एका ट्रे मध्ये ६० रोपटी लावली जातात. यात प्लास्टिकच्या पिशव्या बुडाखालून मोकळ्या असतात त्यामुळे पाणी लवकर झिरपते रोप झपाट्याने वाढते.
 
पावसाळ्याची तयारी आत्तापासूनच
उन्हाळ्यातरोपांची लागवड करून जगवली तरच ती पावसाळ्यात त्यांचे रोपण करता येते. त्यामुळे वन विभगाने ऐन उन्हाळ्यातच रोपे तयार करण्यास सुरुवात केली आहे. पावसाळा सुरू होताच त्यांचे वितरण सुरू केले जाईल. पावसाळ्यात ही रोपे जोमाने वाढतील, असे वन विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...