आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा-देवळाईमधील वनक्षेत्राला भिंत बांधणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील काही दिवसांमध्ये शहर तसेच जवळील जमिनीवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत असल्याने अतिक्रमणाच्या धास्तीने प्रशासनाने वन विभागाच्या अख्त्यारीत असलेल्या जमिनी संरक्षित करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी केवळ तारांचे कंपाउंड करून जमिनीची हद्द ठरवून भाग अधोरेखित करण्यात येत होते. परंतु आता सातारा-देवळाईजवळील वनक्षेत्राला दाेन मीटरची संरक्ेषक भिंत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे वनक्षेत्राची जमीन अतिक्रमणापासून वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
वनविभागाने काही महिन्यांपूर्वी शासनाकडे वन परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या भागाला संरक्षक भिंती बांधण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला हाेता. त्याला मान्यता देत महसूल आणि वन विभागातर्फे नोव्हेंबर रोजी अंदाजपत्रक प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सातारा, देवळाई, कुंभेफळ, नक्षत्रवाडी या भागात वन विभागाच्या हद्द परिसरात भिंत बांधण्यात येणार आहे. एकूण ४१७९ मी. जागेच्या संरक्षणासाठी कोटी १२ लाख ६३ हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. भिंत उभारण्याचे काम सुरू होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

भिंत बांधल्याने वनक्षेत्र अबाधित राहिल
या परिसरांमधून मुरूम चोरी होण्याची शक्यता असते. तसेच वनक्षेत्र अबाधित राहावे, वनक्षेत्रातील प्राण्यांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी भिंत बांधण्यात येत आहे. आर.ए. नागापूरकर, वन अधिकारी.

३२ किलोमीटरची साताऱ्याची एकूण हद्द
९.६ किलोमीटरची देवळाई हद्द

मिटमिटा, भावसिंगपुरा येथे अंमलबजावणी होणार
भावसिंगपुराआणि मिटमिटा परिसरातील वनक्षेत्राच्या जमिनीला संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. दोन्ही परिसर मिळून २५५० मीटर जागेसाठी कोटी ९६ लाख ३३ हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. सातारा-देवळाईच्या जागेसह या ठिकाणीही काम सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कुंभेफळ परिसरही भविष्यात दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पाअंतर्गत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा-देवळाईसह याही जमिनीला मोठी मागणी असण्याची शक्यता असल्याने या परिसराचा समावेश करण्यात आला आहे.

या कारणामुळे प्रशासनाने घेतला निर्णय?
सातारा-देवळाईपरिसरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण झाल्या आहेत. नुकतेच या भागाचा महानगरपालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिक, पुढाऱ्यांचा येथील जमिनीवर डोळा असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सातारा-देवळाई तसेच कुंभेफळ परिसर वनविभागाच्या अख्त्यारीत येतो. हा धोका लक्षात घेता सर्व जमिनीला संरक्षक भिंत बांधून सूचित केल्यास अतिक्रमण होण्याची भीती राहणार नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...