आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Forest News In Marathi, Environment, Oxygen Hub, Divya Marathi, Aurangabad

ऑक्सिजन हबवर होतोय हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागोजागी तुटलेली सुरक्षा भिंत, अपुरे सुरक्षारक्षक आणि प्रशासनाची बेपर्वा वृत्ती यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बेसुमार वृक्षतोड होत आहे. गेल्या दोन महिन्यांत 50 पेक्षाही जास्त झाडांवर घाव घातले गेले. परिणामी, पक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. त्यामुळे घनदाट वनश्रीने नटलेला हा जुना परिसर आपली ओळखच हरवून बसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 250 एकरांचा हा परिसर म्हणजे ऑक्सिजन हब समजला जातो. विशेष म्हणजे पूर्वीपासून वनश्री जपल्या गेलेल्या या परिसरात वृक्षगणना झालेलीच नाही.
शहरात अजूनही विद्यापीठ परिसर, हिमायत बाग अन् सलीम अली सरोवर या ठिकाणीच बर्‍यापैकी वृक्षसंपदा आहे. तीही नष्ट झाली, तर शहर व परिसरात कुठेही हिरवाई दिसणार नाही. ही तिन्ही ठिकाणे शहरातील मोठे ऑक्सिजन हब मानले जातात. त्यामुळेच शेकडो लोक लांबून खास या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येतात.

पुढे वाचा 110 प्रकारच्या पक्षी अन् वृक्षांविषयी..